केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत कृषी व सहकार विभागात मार्केटिंग ऑफिसरच्या ६९ जागा
 अर्जदारांनी कृषी, कृषी अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर पात्रता घेतलेली असावी व त्यांना संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या ९ ते १५ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०१३.

असम रायफल्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ८ जागा
 अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असून शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २३ वर्षे.
अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या ९ ते १५ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली असम रायफल्सची जाहिरात पाहावी अथवा असम रायफल्सच्या http://www.assamrifles.gov.in  संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टोरेट जनरल, असम रायफल्स (रिक्रूटमेन्ट ब्रँच), लैटकर पोस्ट, शिलाँग, मेघालय-७९३०१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०१३.

स्टील ऑथॉरिटीमध्ये कुशल कामगारांच्या ४०२ जागा
 उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेटॅलर्जी, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, सिरॅमिक्स, केमिकल वा इन्स्ट्रमेन्टेशन इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २८ वर्षे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या ९ ते १५ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘सेल’ची जाहिरात पाहावी अथवा ‘सेल’च्या http://www.sail.co.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०१३.

इंडो-तिबेटन सीमा सुरक्षा दलात सिव्हिल इंजिनीअर्सच्या १० जागा उमेदवार सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २ ते ८ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि सीनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (पर्सोनल), डायरेक्टोरेट जनरल, इंडो-तिबेटन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, ब्लॉक ३, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०१३.

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंगमध्ये कनिष्ठ कारकुनांच्या ३ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण व हिंदी आणि इंग्रजीची ३० शब्द प्रति मिनिट पात्रता उत्तीर्ण झालेले असावेत. संगणकाचे अद्ययावत ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या ९ ते १५ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशनची जाहिरात पाहावी अथवा http://www.nuepa.org  संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०१३.

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये साहाय्यक व्यवस्थापकांच्या ७३ जागा
उमेदवार इंजिनीअरिंग, तंत्रज्ञान, कृषी, कॉमर्स, कायदा वा वैद्यकशास्त्र विषयातील पदवीधर असायला हवेत. विमा व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पात्रता अथवा विमा सर्वेक्षणविषयक पात्रताधारकांना प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी जीआयसीच्या http://www.gicofindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने जीआयसीच्या http://gic.eadmissions.net  संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१३.