भारत प्रतिभूती मुद्रण व मुद्रा- निगममध्ये ऑफिसर टेक्निकल इलेक्ट्रॉनिक्सच्या १६ जागा
अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केलेली असावी. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ ऑक्टोबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली भारत प्रतिभूती मुद्रण-मुद्रा निगमची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज डीजीएम (पसरेनेल) सिक्युरिटी प्रिंटिंग अ‍ॅण्ड माइनिंग कॉपरेरेशन ऑफ इंडिया, १६वा मजला, जवाहर व्यापार भवन, जनपथ, नवी दिल्ली ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर २०१३.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्व-तटीय रेल्वेमध्ये कुशल कामगारांच्या १६२६ जागा उपलब्ध
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ ऑक्टोबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली पूर्व-तटीय रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज रेल्वे रिक्रूटमेंट सेल, ईस्ट कोस्ट रेल्वे हेडक्वॉर्टर्स, साऊथ ब्लॉक, रेल सदन, चंद्रशेखरपूर, भुवनेश्वर (ओडिशा) ७५१०१७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१३.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment opportunities
First published on: 28-10-2013 at 07:51 IST