इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंटच्या ६० जागा : अर्जदारांनी केमिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रमेंटेशन वा इंडस्ट्रियल इंजिनीअरिंगमधील पदविका कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा सुमारे ३ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २६ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ जानेवारी २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ऑइलची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या www.iocl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॅग नं. ००६, श्रीनिवासपुरी पोस्ट ऑफिस, श्रीनिवासपुरी, नवी दिल्ली ११००६५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०१३.
भारतीय कंटेनर कॉर्पोरेशनमध्ये मॅनेजमेंट ट्रेनीजच्या पाच जागा : उमेदवारांनी मेकॅनिकल, सिव्हिल वा कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी, त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांनी जीएटीई २०१३ ही प्रवेश पात्रता परीक्षा पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ जानेवारी २०१३ च्या अंकातील भारतीय कंटेनर कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या ६६६.ूल्लू१्रल्ल्िरं.ू.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०१३.
स्काऊट्स आणि गाइड्ससाठी मध्य रेल्वेत सहा जागा : अर्जदारांनी शालान्त परीक्षा व त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची परीक्षा कमीत कमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व स्काऊट्स वा गाइड्स क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ जानेवारी २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि पोस्टल ऑर्डरसह असणारे अर्ज डेप्युटी चीफ पर्सोनेल ऑफिसर (रिक्रूटमेंट), रेल्वे रिक्रूटमेंट सेल, वाडीबंदर, पी. डी’मेलो मार्ग, मुंबई ४०००१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०१३.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कुशल कामगारांसाठी १९ जागा अर्जदार शालान्त परीक्षा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची मोटर मेकॅनिक अथवा ऑटो इलेक्ट्रिशियनची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत अथवा त्यांनी त्याच विषयातील राष्ट्रीय कौशल्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २८ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ जानेवारी २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील व आवश्यक ते कागदपत्र आणि पोस्टल ऑर्डरसह असणारे अर्ज डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, सीआयएसएफ युनिट, जीबीएस, १६/११, जामनगर हाऊस, नवी दिल्ली ११००११ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०१३. ठ