नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (आरआरसी), सेंट्रल रेल्वेने सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून स्टेनोग्राफर, सीनियर कॉमन क्लार्क कम तिकीट क्लार्कसह अन्य रिक्त पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ५९६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया २८ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०२२ आहे.

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून स्टेनोग्राफर – ८, सीनियर क्लर्क कम टिकिट क्लर्क – १५४, गुड्स गार्ड – ४६, स्टेशन मास्टर – ७५, जूनियर ब्युटीअल असिस्टंट – १५०, जूनियर क्लर्क कम टिकिट क्लर्क – १२६, अकाउंट्स क्लर्कच्या – ३७ पदांवर भरती केली जाणार आहे.

BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार
Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
Indian Merchant Navy Seaman Recruitment 2024
सुवर्णसंधी! भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये मेगा भरती! मिळेल चांगला पगार, आज करा अर्ज
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
  • पात्रता

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा. तसेच त्याचा ५० मिनिटांच्या ट्रान्सक्रिप्शन स्पीडसह १० मिनिटांच्या कालावधीसाठी ८० शब्द प्रति मिनिट असा लघुलेखन वेग असावा. इतर पदांसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.

  • वयोमार्यादा

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमार्यादा खुल्या प्रवर्गासाठी ४२ वर्षे, मागासवर्गासाठी ४५ वर्षे आणि एससी/एसटी वर्गासाठी ४७ वर्षे आहे.

  • निवड प्रक्रिया

रेल्वेमधील या रिक्त पदांसाठी उमेदवाराची निवड लिखित परीक्षा, स्किल टेस्ट, कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. लिखित परीक्षेतील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण निगेटिव्ह मार्किंग केले जाईल. ही रेल्वे भरती आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचारी वगळता मध्य रेल्वेच्या सर्व नियमित रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार rrccr.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.