इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅटोमिक रिसर्च- कालपक्कम तर्फे देण्यात येणाऱ्या संशोधनपर शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
शिष्यवृत्तींची संख्या : एकूण उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या २०.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी विज्ञान वा अभियांत्रिकी विषयातील संशोधनपर पीएच.डी. केलेली असावी अथवा त्यांनी आपला संशोधन प्रबंध सादर केलेला असावा अथवा त्यांनी अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यावर त्यांना संबंधित क्षेत्रांतील कामाचा तीन वर्षांचा अनुभव असायला हवा.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय ३५ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्या आधारे त्यांची निवड करण्यात येईल.
शिष्यवृत्तीचा कालावधी व रक्कम : निवड झालेल्या उमेदवारांना या योजनेंतर्गत दोन वर्षे कालावधीसाठी नेमण्यात येईल. त्यादरम्यान त्यांना २१ हजार रु. ते २४ हजार रु. दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय त्यांना शैक्षणिक खर्चापोटी दरवर्षी २० हजार रु.ची रक्कम देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशील : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅटॉमिक रिसर्च- कालपक्कमच्या http://www.igcar.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विशेष सूचना : वरील योजनेंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया वर्षभर सुरू असल्याने उमेदवार त्या दृष्टीने अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची पद्धत : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅटॉमिक रिसर्च, कालपक्कम, तामिळनाडू-६०३१०२ या पत्त्यावर पाठवावेत.
विज्ञान व तंत्रज्ञान : अभियांत्रिकी विषयातील ज्या पीएच.डी.धारकांना याच क्षेत्रात शिष्यवृत्तीसह संशोधनपर काम करायचे असेल अशांनी या योजनेचा  लाभ घ्यावा.