आजच्या लेखात आपण पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेची माहिती करून घेऊ. सहायक, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या पदाकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षेतील पेपर क्र. १ चा अभ्यासक्रम सारखाच आहे. परंतु मुख्य परीक्षेतील पेपर क्र. २च्या अभ्यासक्रमातील काही विषय हे संबंधित पदाच्या जबाबदारीनुसार आणि कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळे आहेत. पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेतील पेपर क्र. २ मध्ये मानवी हक्क व जबाबदाऱ्या, मुंबई पोलीस कायदा, भारतीय दंडसंहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता- १९७३, भारतीय पुरावा कायदा (India Evidence Act) हे विषय वेगळे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम

पेपर क्र.१

  • मराठी- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण म्हणी व वाक् प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
  • इंग्रजी- उेल्ल Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Uses of Idioms and Phrases & their meaning & Comprehension & passages.

पेपर क्र. २

  • जागतिक घडामोडी, भारतातील चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • महाराष्ट्राचा भूगोल
  • महाराष्ट्राचा इतिहास
  • भारतीय राज्यघटना
  • माहिती अधिकार अधिनियम- २००५
  • संगणक व माहिती तंत्रज्ञान
  • मानवी हक्क व जबाबदाऱ्या- संकल्पना- आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक- सांस्कृतिक- धार्मिक प्रथा यांसारख्या अडचणी (िहसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे संरक्षण, गुन्हेगारी इ.) नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.
  • मुंबई पोलीस कायदा
  • भारतीय दंडसंहिता
  • फौजदारी प्रक्रिया संहिता- १९७३
  • भारतीय पुरावा कायदा (Indian Evidence Act)

मुख्य परीक्षेचे विश्लेषण

वरील विश्लेषणावरून असे लक्षात येते की, बुद्धिमत्ता चाचणीवर केवळ दहा प्रश्न विचारले आहेत आणि मानवी हक्क व जबाबदाऱ्या आणि सर्व कायदे यांवर १०० पैकी ४६ प्रश्न विचारले आहेत. मानवी हक्क व जबाबदाऱ्या या विषयातील स्त्रीविषयक प्रश्न, कायदे, अनुसूचित जाती-जमातीसंबंधी प्रश्न व कायदे यांवर भर अधिक होता.

संदर्भ साहित्य सूची

  • चालू घडामोडी : योजना, लोकराज्य, करंट ग्राफ वार्षिकी.
  • बुद्धिमत्ता चाचणी : चौथी ते सातवी शिष्यवृत्तीची पुस्तके, आठवी व नववीची ‘एमटीएस’ पुस्तके, क्वान्टिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड- आर. एस. अगरवाल.
  • भूगोल : महाराष्ट्राचा भूगोल- सवदी.
  • इतिहास : पूर्वपरीक्षेची सर्व पुस्तके, आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर.
  • राज्यशास्त्र : भारतीय राज्यघटना- डी. डी. बसू, इंडियन पॉलिटी – एम. लक्ष्मीकांत.
  • माहिती अधिकार अधिनियम २००५ : प्रत्यक्ष अधिनियम, इंटरनेट, यशदाचे संकेतस्थळ.
  • संगणक व माहिती तंत्रज्ञान : बँकेच्या आणि स्टाफ सिलेक्शनच्या प्रश्नपत्रिका.
  • मानवी हक्क व जबाबदाऱ्या : मानव संसाधन विकास आणि मानवाधिकार – रंजन कोळंबे.
  • मुंबई पोलीस कायदा, भारतीय दंडसंहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, भारतीय पुरावा कायदा- प्रत्यक्ष अधिनियम, इंटरनेट, यशदाचे संकेतस्थळ.
  • मराठी : मराठी व्याकरण- मो. रा. वािळबे.
  • इंग्रजी : English Grammer- Wren & Martin.
  • सरावासाठी एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शनच्या प्रश्नपत्रिका, टाटा मॅकग्राहिलचे प्रश्नसंच.

शारीरिक चाचणीचा तपशील

मुख्य परीक्षेकरिता आयोगाने विहित केलेले किमान किंवा अधिक गुण मिळविणारे व उंची व छातीविषयक विहित मोजमापाच्या अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचीच चाचणी घेण्यात येते, ती पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र असते.

मुलाखत

शारिरिक चाचणीमध्ये किमान ५० गुण प्राप्त करणारे उमेदवार मुलाखतीस पात्र ठरतात. यासाठी मॉक इंटरव्ह्य़ू देऊन मुलाखतीचा सराव करावा.

अंतिम निकालात मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचे गुण एकत्रित करून गुणवत्ता यादी बनवली जाते. एकूणच ही सर्व तयारी करताना तुमचा सर्वागीण विकास घडून येतो. तुमच्या स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीस खूप शुभेच्छा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information police inspector exam
First published on: 08-02-2016 at 01:13 IST