अर्जदार कुठल्याही विद्याशाखेतील पदवीधर व स्टेनोग्राफीमधील पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट  न्यूज’च्या १४ ते २० नोव्हेंबर २०१५ च्या अंकातील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीची जाहिरात पाहावी अथवा अकादमीच्या  www.lbsnaa.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज जॉइंट डायरेक्टर, लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरी येथे  १३ जानेवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

बँक  नोट  प्रेस, देवास येथे सुपरवायझर (टेक्निकल कंट्रोल)च्या ३१ जागा

अर्जदार पदवीधारक इंजिनीअर असावेत. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील पात्रताधारकांना प्राधान्य. वयोमर्यादा ३० वर्षे.

अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ डिसेंबर २०१५ ते १ जानेवारी २०१६ च्या अंकातील बँक नोट प्रेस, देवासची जाहिरात पाहावी. अथवा www.bnpdewas.spmcil.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १४ जानेवारी २०१६ पर्यंत  अर्ज करावेत.

केंद्रीय अर्थमंत्रालयांतर्गत सेंट्रल रेव्हेन्यूज कंट्रोल लेबॉरेटरीमध्ये केमिकल एक्झामिनरच्या १० जागा

अर्जदार रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. त्यांना संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव असायला हवा. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ डिसेंबर २०१५ ते १ जानेवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या  www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १४ जानेवारी २०१६ पर्यंत अर्ज करावा.

संरक्षण मंत्रालयाच्या स्थापत्य विभागात डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या ५ जागा

उमेदवार बारावी उत्तीर्ण व संगणकविषयक पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमूना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ डिसेंबर २०१५ च्या अंकातील संरक्षण मंत्रालय स्थापत्य विभागाची जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर, डिफेन्स इस्टेट, साउथ वेस्टर्न कमांड, एच- ४१, टागोर पथ, बानी पार्क, जयपूर ३०२०१६ या पत्त्यावर १५ जानेवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

संरक्षण  मंत्रालयाच्या  नौदल विभागात ड्राफ्ट्समनच्या ४६६ जागा

अर्जदार सिव्हिल, मेकॅनिकल, इक्ट्रिकल, नेव्हल ऑर्किटेक्चर वा शिप बिल्डिंग यांसारख्या विषयातील पदविकाधारक असावेत. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ नोव्हेंबर २०१५ च्या अंकातील संरक्षण मंत्रालय- नौदल विभागाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टोरेट ऑफ सिव्हिल मॅनपॉवर अ‍ॅण्ड रिक्रुटमेंट, रूम नं. ११२, बी विंग, सेना भवन, डीएचक्यू पोस्ट, नवी दिल्ली- ११००११ या पत्त्यावर २० जानेवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

छात्र- सैनिकांसाठी सैन्यदलात ५४ जागा

अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर एनसीसीचे सी प्रमाणपत्रधारक व शारीरिकदृष्टय़ा पात्र असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे.

अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ डिसेंबर २०१५ ते १ जानेवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज छात्रसेनेच्या संबंधित मुख्यालयात २० जानेवारी २०१६ पर्यंत जमा करावेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी सहायकाच्या ३८ जागा

उमेदवार केमिकल, पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल वा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत. त्यांना संबंधित कामाचा किमान १ वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २६ वर्षे.

अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ डिसेंबर २०१५ ते १ जानेवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा www.iocl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज चीफ ुमन रिसोर्स मॅनेजर, बरूनी रिफायनरीज, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., बरूनी ऑइल रिफायनरी, जि. बरूनी- ८५१११४ या पत्त्यावर  २० जानेवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunities in government sector
First published on: 11-01-2016 at 00:35 IST