|| डॉ. श्रीराम गीत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • सर मी सध्या बारावी सायन्सला आहे. बीएसएफमध्ये सब इन्स्पेक्टर व्हायचे आहे. त्याची पात्रता व परीक्षा याची माहिती द्याल का? – श्रेयस श्रीराम

श्रेयस प्रथम उत्तम मार्कानी पदवी मिळव. त्या दरम्यान शारीरिक क्षमता वाढवत राहा. केवळ बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच नव्हे तर इतरही सेवांमध्ये तुला संधी मिळू शकते. तुझ्यासाठी युनिफॉर्म सव्‍‌र्हिसेसमधील सबइन्स्पेक्टरचे पद असा शब्द मी सुचवत आहे. सेंट्रल सव्‍‌र्हिसेस, एक्साइज, सेल्स टॅक्स, फॉरेस्ट, पोलीस खाते यापैकी कोणत्याही क्षेत्रात समान संधी (व परीक्षेच्या जवळपास सारख्याच अभ्यासाची) उपलब्ध असतात. सध्याचे तुझे वय अजून वाढीचे आहे. त्यामुळे पदवीपर्यंत उंची व वजन दोन्ही वाढून त्यात भर पडू शकते. पात्रता शारीरिकदृष्टय़ा तयार होत जाते. त्याचा विचार आता नको. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीएसएफमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या एखाद्या सबइन्स्पेक्टरला प्रत्यक्ष भेटून माहिती घ्यावी. त्यानंतर त्यासाठी प्रयत्न सुरू करणे रास्त राहील. आकर्षण व वास्तव यातील फरक जाणून घेणे प्रत्येकच करिअरच्या संदर्भात महत्त्वाचे असते.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta career mantra
First published on: 23-01-2019 at 01:10 IST