Maharashtra HSC Result 2022 Date & Time: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीचा निकाल बुधवारी ८ जून २०२२ रोजी जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारांनी निकालासंबंधित सर्व नवीन माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट तपासत रहावे.

महाराष्ट्र एचएससी निकाल १० जून २०२२ रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध होणार असे अपेक्षित होते. परंतु निकाल उद्या ८ जून रोजी जाहीर केले जाणार असल्याचे बोर्डाकडून अधिकृत अधिसूचना जारी केले गेले आहे.

Maharashtra State Board, 10th and 12th Exam, 10th and 12th Exam Results, 10th and 12th Results Earlier than Last Year, 10 th and 12 th exam result 2024, hsc exam result 2024, ssc exam result 2024,
राज्य मंडळाकडून दहावी, बारावीच्या निकालाबाबत अपडेट… गेल्या वर्षीपेक्षा यंदा लवकर निकाल
Maharashtra Board class 10th and 12th result date 2024
SSC & HSC Result Date 2024: १० वी, १२ वीचा निकाल कधी लागतो? कुठे व कसा पाहावा, गतवर्षीची आकडेवारी काय सांगते?
ugc new decision direct admission to phd after graduation
आता पदवीनंतर पीएच.डी.ला मिळणार थेट प्रवेश! काय आहे युजीसीचा नवा निर्णय? युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांची माहिती 
gadchiroli marathi news, gadchiroli upsc marathi news
गडचिरोलीत स्वत:हून ‘पोस्टिंग’ घेणाऱ्या बीडीओची ‘युपीएससीत’ही भरारी…..

‘या’ वेबसाईटवर लॉग इन करून निकाल पाहू शकतात:

  • msbshse.co.in
  • hscresult.mkcl.org
  • mahresult.nic.in.

(हे ही वाचा: Maharashtra HSC Result 2022: महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल ‘या’ तारखेला अपेक्षित; जाणून घ्या अधिक तपशील)

‘असा’ तपासा निकाल

  • महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in वर जा.
  • होमपेजवर, MSBSHSE १२वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा, निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.
  • तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
  • तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.

(हे ही वाचा: NABARD recruitment 2022: नोकरीची संधी; अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या अधिक तपशील)

महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १४ लाख विद्यार्थी एचएससी परीक्षेला बसतात. गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र बोर्डाने दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन आणि चाचणीच्या आधारे उत्तीर्ण करण्यात आले. मात्र यंदाही बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीप्रमाणेच झाल्या, त्यामुळे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.