NABARD recruitment 2022: नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD ) ने बँकेच्या वैद्यकीय अधिकारी (BMO) ची १ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही नोकरी कॉट्रक्ट बेसेसवर असेल. पात्र उमेदवार ४ जून २०२२ ते २४ जून २०२२ पर्यंत रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. अधिक तपशील जाणून घ्या.

पात्रता निकष

  • अर्जदाराकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठाच्या अ‍ॅलोपॅथिक सिस्टिम ऑफ मेडिसिनमध्ये एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.
  • सामान्य औषधात पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात आणि अर्जदाराला वैद्यकीय व्यवसायी म्हणून कोणत्याही हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.

(हे ही वाचा: Indian Bank Recruitment 2022: ३००हून अधिक जागांसाठी होणार भरती, पगार ८९ हजाराहून अधिक)

upsc capf recruitment 2024 registration begins apply for 506 assistant commandant
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ‘इतक्या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या कशी होईल निवड, पगार आणि अर्जाची प्रक्रिया
India Post Recruitment 2024
India Post Jobs 2024: इंडिया पोस्टमध्ये निघाली भरती! ६३ हजारपर्यंत मिळेल पगार, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया
pune rte marathi news
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया सुरू… कसा आहे पालकांचा प्रतिसाद?
A unique wedding invitation card from Pune encouraged citizens to exercise their voting rights
लग्नपत्रिका नव्हे! या हटके पत्रिकेतून केली लोकांना मतदान करण्याची विनंती, एकदा क्लिक करून नीट पाहाच

पगार किती?

  • कराराच्या आधारावर बीएमओचे मानधन प्रत्यक्ष कामाच्याच्या तासांच्या संदर्भात निश्चित केले जाईल आणि ते सर्वसमावेशक असेल.
  • पहिल्या ३ वर्षांच्या कंत्राटी सेवेसाठी रु. १०००/- प्रति तास आणि ३ वर्षे कंत्राटी सेवा पूर्ण झाल्यावर रु. १२००/- प्रति तास असू शकतात.

(हे ही वाचा: ECIL Recruitment 2022: नोकरीची संधी!! पगार ३७,००००; जाणून घ्या अधिक तपशील)

निवड प्रक्रिया कशी असेल?

  • पात्र उमेदवारांच्या मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. मुलाखतीसाठी बोलावल्या जाणाऱ्या उमेदवारांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी, किमान पात्रता मानके इत्यादी वाढवण्याचा अधिकार बँकेकडे आहे.
  • याबाबत बँकेचा निर्णय अंतिम असेल. ज्या अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलावले गेले नाही त्यांच्याशी बँक कोणताही पत्रव्यवहार करणार नाही.

(हे ही वाचा: एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या पोस्ट, पात्रता आणि पगार)

स्वारस्य असलेले आणि पात्र अर्जदार परिशिष्ट- I प्रमाणे संलग्न नमुन्यात अर्ज करू शकतात. अर्ज ‘कराराच्या आधारावर BMO पदासाठी अर्ज’ वर लिहिलेल्या कव्हरमध्ये पाठवावा. अर्ज मुख्य महाव्यवस्थापक, नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, उत्तराखंड प्रादेशिक कार्यालय प्लॉट क्रमांक ४२, आयटी पार्क, सहस्त्रधारा रोड-२४८०१३ यांच्याकडे २४ जून २०२२ किंवा त्यापूर्वी पोहोचला पाहिजे. सर्व कागदपत्रांसह अर्जाची स्कॅन केलेली प्रत dehradun@nabard.org वर मेल द्वारे dehradun@nabard.org वर प्रत पाठवावी. अधिक माहितीसाठी अधिकृत नोटीफीकेशन पहा.