राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर ४ मध्ये अर्थव्यवस्था, कृषी व विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा तीन विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. अभ्यासाच्या सोयीसाठी या पेपरच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना कशा प्रकारे करता येईल याची चर्चा या व पुढील लेखांमध्ये करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • भारतीय अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्थेमधील आव्हाने – गरिबी, बेरोजगारी व प्रादेशिक असमतोल, नियोजन – प्रक्रिया प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षकि योजनांचा आढावा मूल्यमापन, विकासाचे सामाजिक व आíथक निदर्शक, राज्य व स्थानिक स्तरावरील नियोजन, विकेंद्रीकरण संविधानातील ७३वी व ७४वी सुधारणा.
  • महाराष्ट्राची अर्थव्यवस्था – कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांची ठळक वैशिष्टय़े – महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन महाराष्ट्रातील एफडीआय.
  • समष्टि अर्थशास्त्र – राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनाच्या पद्धती पशांची काय्रे – आधार पसा – जननक्षम पसा- पशाचा संख्या सिद्धांत पसा गुणक, चलनवाढीचे पसाविषयक व पसाव्यतिरिक्त सिद्धांत -चलनवाढ नियंत्रण -चलनविषयक, आíथक आणि थेट उपाययोजना.
  • सार्वजनिक वित्त व्यवस्था आणि वित्तीय संस्था – पणन अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक वित्तव्यवस्थेची भूमिका सरकारी गुंतवणुकीचे निकष गुण वस्तू व सार्वजनिक वस्तू – महसुलीचे स्रोत व खर्च (केंद्र व राज्य)  करांचे स्वरूप आणि अर्थसाहाय्य आणि त्यांचा भार व परिणाम – केंद्राचे व भारतातील राज्यांचे  कर, करेतर व सरकारी ऋण. सरकारी खर्च (केंद्र व राज्य)- वाढ व त्याची कारणे – सरकारी खर्च सुधारणा – कामगिरी आधारित अर्थसंकल्पन – शून्याधारित अर्थसंकल्प – अर्थसंकल्पीय तुटीचे प्रकार – देशांतर्गत आणि देशाबाहेरील कर्ज, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील कर सुधारणांचे पुनर्वलिोकन – मूल्यवíधत कर. सरकारी ऋण – वाढ, रचना व भार, केंद्राला असणारी राज्याची कर्जाची समस्या, राजकोषीय तूट व तुटींची संकल्पना आणि नियंत्रण – केंद्र, राज्य आणि भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचा पुढाकार, भारतातील राजकोषीय सुधारणा – केंद्र व राज्य स्तरावरील आढावा, वित्तीय क्षेत्र सुधारणा – बँकिंग क्षेत्रातील नवीन प्रवाह – खरेखुरे आणि नाममात्र व्याजदर – रेपो आणि प्रतिकूल रेपो व्यवहार.
  • गरिबीचे निर्देशांकन व अंदाज – दारिद्रय़ रेषा व संकल्पना व वस्तुस्थिती, दारिद्रय़रेषेखालील, दारिद्रय़ निर्मूलनाच्या उपाययोजना – भारतातील जननक्षमता, विवाहदर, मृत्युसंख्या व रोगटपणा – लिंग सक्षमीकरण धोरण.
  • रोजगार निर्धारणाचे घटक – बेरोजगारीसंबंधात उपाययोजना – उत्पन्न, दारिद्रय़ व रोजगार यांच्यामधील संबंध वितरणासंबंधात प्रश्न व सामाजिक न्याय.
  • भारतीय उद्योग क्षेत्र – कल, उद्योगाची रचना व वाढ, भारतातील पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्र – लोकांची भूमिका, भारतातील खासगी व सहकारी क्षेत्र – लघुउद्योग व कुटीर उद्योग, बीपीओ.
  • उद्योग गरजा – आर्थिक व सामाजिक विकासात उद्योगाचे महत्त्व व भूमिका वाढीचा आकृतिबंध, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात भारतातील मोठय़ा उद्योगांची संरचना, लघुउद्योग, कुटीर व ग्रामोद्योग, त्यांच्या समस्या व दृष्टिकोन, उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण यांचे लघुउद्योगांवरील परिणाम, लघुउद्योगांचा विकास, प्रचालन व संनियंत्रण यांकरिता महाराष्ट्राचे धोरण, उपाययोजना व कार्यक्रम, लघुउद्योग व कुटीर उद्योग यांची निर्यात क्षमता, विशेष आíथक क्षेत्र (एसईझेड), एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेईकल) भारतीय उद्योगधंद्यामधील उदारमतवाद आणि त्याचे परिणाम – उद्योगातील आजारीपण.
  • पायाभूत सुविधांचा विकास हा घटक व्यापक पारंपरिक अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाचाच घटक आहे. पेपर -४ मधील ‘अर्थव्यवस्था’ या घटकाच्या उर्वरित अभ्यासक्रमाची अभ्यासाच्या सोयीसाठीची पुनर्रचना कशा प्रकारे करता येईल त्याची चर्चा पुढील लेखामध्ये करण्यात येईल.
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi articles on economics courses analysis
First published on: 28-06-2017 at 01:58 IST