पं. गोविंद वल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठांतर्गत असणाऱ्या पंतनगर येथील कॉलेज ऑफ अ‍ॅग्री-बिझनेसमध्ये  कृषी व्यवस्थापन विषयातील एमबीए अभ्यासक्रम उपलब्ध असून या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेच्या प्रवेशपरीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल.
शैक्षणिक पात्रता
या अभ्यासक्रमाला अर्ज  करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कृषी अथवा कृषी अभियांत्रिकी यासारख्या विषयातील पदवी वा पदव्युत्तर पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
जे विद्यार्थी यंदा कृषी अथवा कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या  अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसणार असतील तेसुद्धा या अभ्यासक्रमाला अर्ज करण्यास पात्र आहेत.
निवड प्रक्रिया
अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या सीएमएटी-२०१४ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल.
अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व सीएमएटी-२०१४ मधील गुणांकाच्या आधारे त्यांना समूह चर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. त्यातील कामगिरीनुसार त्यांना एमबीए-अ‍ॅग्रिबिझनेस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येईल.
करिअर संधी  
कृषी व्यवस्थापनात उत्तम गुणांनी एमबीए पूर्ण केलेल्या उमेदवारांना कृषी प्रक्रिया कंपन्या, विपणन कंपन्या अथवा संस्था, अन्न प्रक्रिया उद्योग, बँका वा कृषी सहकारी संस्था इत्यादी क्षेत्रांमध्ये करिअरविषयक संधी उपलब्ध आहेत.
अर्ज व माहितीपत्रक
अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास १,५०० रु.चा अधिष्ठाता-सीएबीएम यांच्या नावे असणारा व पंजाब नॅशनल बँक (शाखा ४४४६)- पंतनगर येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी गोविंद वल्लभ पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या http://www.cabm.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्जासह पाठवायचे शुल्क
अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून तीन हजार रुपयांचा आणि वर नमूद केल्यानुसार असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्रे आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे प्रवेश अर्ज अधिष्ठाता- कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल मॅनेजमेंट, गोविंद वल्लभ पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, पंतनगर- २८३१४५ या पत्त्यावर १० मार्च २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mba in agricultural management entrance exam
First published on: 23-02-2015 at 01:03 IST