केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सामायिक वैद्यकीय सेवा परीक्षा- २०१५ या स्पर्धा परीक्षेसाठी अर्जप्रक्रिया सुरू
झाली आहे.
जागांची संख्या : या स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणाऱ्या जागांची एकूण संख्या १,४०२ असून त्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रेल्वे विभागांतर्गत ६००, आयुध निर्माणी आरोग्य सेवेअंतर्गत ३९, मध्यवर्ती आरोग्य सेवेत ३९१ आणि दिल्ली महापालिका आरोग्य सेवेतील
३६२ जागांचा समावेश आहे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर २८ जून २०१५ रोजी
घेण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळवणाऱ्या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे मुलाखत व वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात येईल आणि त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वयोमर्यादा : अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास
त्यांचे वय ३२ वर्षांहून अधिक नसावे. सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम आहे.
अर्जासह भरायचे शुल्क :   अर्जासह भरायचे शुल्क म्हणून २०० रु. रोख स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा स्टेट बँकेच्या सहयोगी बँकेच्या शाखेत भरणे आवश्यक आहे.
अधिक तपशील :  अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० मार्च २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १० एप्रिल २०१५ पर्यंत अर्ज करावा.     
शैक्षणिक पात्रता
अर्जदारांनी वैद्यकशास्त्र विषयांतर्गत एमबीबीएस पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते एमबीबीएस पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medical services examination
First published on: 05-04-2015 at 01:06 IST