सैन्यदलातर्फे खास महिलांसाठी चार वर्षे कालावधीचे बी.एस्सी. नर्सिग, जनरल नर्सिग व मिडवाइफरी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. २०१६ या शैक्षणिक सत्रातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश पात्रता परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
जागांची संख्या
अभ्यासक्रमामध्ये सैन्यदलाच्या विविध वैद्यकीय आस्थापनांमध्ये उपलब्ध असणाऱ्या एकूण जागांची संख्या २१० असून त्यामध्ये पुणे येथील आमर्््ड फोर्सेस मेडिकल कॉलेज म्हणजेच एएफएमसी येथील ४० जागांचा समावेश आहे.
आवश्यक पात्रता
अर्जदार अविवाहित महिला असाव्यात. त्या शारीरिकदृष्टय़ा सक्षम असाव्यात. त्यांनी बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र आणि इंग्रजी हे विषय घेऊन किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
अर्जदार महिलांचा जन्म १ ऑगस्ट १९९१ ते ३१ जुलै १९९९ च्या दरम्यान झालेला असावा.
अर्जासह भरायचे शुल्क
अर्जासह भरायचे शुल्क म्हणून उमेदवारांनी १५० रु. बँक चलनद्वारा डीजीएएफएमएस एक्झामिनेशन बोर्ड फंड स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल सेक्रेटरिएट, नवी दिल्ली, अकाऊंट नंबर-१०३१४२२३०९७ आयएफएससी कोड नं. एसबीआयएन ००००६२५ या खात्यात जमा करावेत.
अधिक माहिती
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेल्या सैन्यदलाच्या बी.एस्सी. नर्सिग अभ्यासक्रमाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या ६६६.्रल्ल्िरंल्लं१े८.ल्ल्रू.्रल्ल किंवा ६६६.्रल्ल्िरंल्लं१े८.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३० डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत. ल्ल ल्ल

निवड प्रक्रिया
अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही प्रवेशपरीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर फेब्रुवारी २०१६ मध्ये घेण्यात येईल. त्यामध्ये मुंबईचा समावेश आहे. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळवणाऱ्या उमेदवारांना
सैन्य निवड मंडळातर्फे
एप्रिल २०१६ मध्ये मुलाखत व वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना बी.एस्सी. नर्सिग
या अभ्यासक्रमात प्रवेश
दिला जाईल.