केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी निवड परीक्षा- २०१५ साठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध जागा : या निवड परीक्षेद्वारा ३६५ जागा भरण्यात येतील.
* राष्ट्रीय संरक्षण अकादमी : उपलब्ध जागांची संख्या ३२० असून त्यामध्ये भूदल- २०८, नौदल- ४२ व हवाई दल- ७० अशा जागांचा समावेश आहे.
* नौदल अकादमी- थेट भरती : उपलब्ध जागांची संख्या ५५ आहे.
आवश्यक शैक्षणिक अर्हता : अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत-
* भूदल व नौदल अकादमी : १० + २ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावी उत्तीर्ण.
* नौदल व हवाई दल : १० + २ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण.
वरील शैक्षणिक पात्रतेबरोबरच उमेदवार सैन्य दलाच्या निवड-निकषांनुसार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत.
वयोमर्यादा : अर्जदारांचा जन्म
२ जानेवारी १९९७ ते १ जानेवारी २००० दरम्यान झालेला असावा.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्र उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे देशांतर्गत निवडक
परीक्षा केंद्रांवर २७ सप्टेंबर २०१५ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये राज्यातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा
समावेश आहे. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना सैन्य निवड मंडळातर्फे शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत भरणे आवश्यक आहे.
अर्जाचा तपशील : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ जून २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळावर १७ जुलै २०१५ पर्यंत अर्ज करावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National defence academy and naval academy entrance exam
First published on: 06-07-2015 at 01:04 IST