सेंट्रल राइस रिसर्च इन्स्टिटय़ूट, कटक येथे सीनिअर टेक्निकल ऑफिसरच्या २ जागा
उमेदवार कृषी वा कृषी विस्तार विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ जुलै २०१५ च्या अंकातील सेंट्रल राइस रिसर्च इन्स्टिटय़ूटची जाहिरात पाहावी. इन्स्टिटय़ूटच्या http://www.crri.nic. या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यात भरलेले अर्ज सीनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सेंट्रल राइस रिसर्च इन्स्टिटय़ूट, कटक- ७५३००६ या पत्त्यावर  ३ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये पदविकाधारक अभियंत्यांसाठी ५ जागा
अर्जदार इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक वा इन्स्ट्रमेंटेशनमधील पदविकाधारक असावेत. त्यांना संबंधित कामाचा किमान एक वर्षांचा अनुभव असावा. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ ऑगस्ट २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडची जाहिरात पाहावी अथवा बीएचईएलच्या http://www.crri.nic या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर  ५ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.
आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथे कनिष्ठ कारकुनांच्या ४ जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक.अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ ऑगस्ट २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेजची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यात भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज दि कमांडंट, आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे-सोलापूर मार्ग, पुणे- ४११०४० या पत्त्यावर
७ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.
संरक्षण मंत्रालयात कनिष्ठ कारकुनांच्या ३ जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. इंग्रजी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची २५ शब्द प्रतिमिनिट पात्रता असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ ऑगस्ट २०१५ च्या अंकातील संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी. भरलेले अर्ज सीनिअर क्वालिटी अ‍ॅन्शुरन्स एस्टॅब्लिशमेंट, डीजीक्यूए कॉम्प्लेक्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, बदरपूर, नवी दिल्ली ११००४४ या पत्त्यावर
७ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.
खडकी कँटॉनमेंट बोर्डात कनिष्ठ कारकुनांच्या ५ जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. ते इंग्रजी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट व महाराष्ट्र सीआयटी पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेन्ट न्यूजच्या ८ ते १४ ऑगस्ट २०१५ च्या अंकातील खडकी कँटॉन्मेन्ट बोर्ड, पुणे ची जाहिरात पाहावी. भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, खडकी कँटॉनमेंट बोर्ड, १७, फिल्ड मार्शल करिअप्पा मार्ग, खडकी-पुणे ४११००३ या पत्त्यावर ७ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.