|| योगेश बोराटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संस्थेची ओळख – देशातील जुन्या विद्यापीठांपकी एक असलेल्या पंजाब विद्यापीठाची सुरुवात १८८२ मध्ये लाहोर येथे झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५८ ते १९६० च्या दरम्यानच्या काळामध्ये हे विद्यापीठ चंदिगढ येथे नव्याने उभारलेल्या संकुलात स्थलांतरित झाले. १९६६पर्यंत रोहतक, शिमला व जालंधरमध्ये विद्यापीठाची विभागीय केंद्रे चालत होती. पंजाबसह हरियाणा, हिमाचल प्रदेश परिसरातील महाविद्यालयेही याच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राचा भाग बनली होती. कालांतराने इतर राज्यांमधील स्वतंत्र विद्यापीठांच्या निर्मितीनंतर, सध्या केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदिगढ व पंजाब राज्यामधील काही भाग या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतो. अध्यापन, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी जपत स्वत:ची वेगळी ओळख बनवण्यात हे विद्यापीठ यशस्वी झाले आहे. यंदा राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक संस्थांच्या ‘एनआयआरएफ’ मूल्यांकनामध्येही हे विद्यापीठ विसाव्या क्रमांकावर आहे. कालसुसंगत अभ्यासक्रमांच्या जोडीने आपल्या वैभवशाली इतिहासाची जाणीव ठेवत ‘पंजाब युनिव्हर्सटिी ओरल हिस्ट्री प्रोजेक्ट’च्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळातील आपल्या इतिहासाची माहिती एकत्रित करण्याचे प्रयत्नही या विद्यापीठाने केले आहेत.

संकुले आणि सुविधा – चंदिगढमध्ये सेक्टर १४ आणि सेक्टर २५ मध्ये एकूण साडेपाचशे एकरांच्या परिसरामध्ये विद्यापीठाची दोन संकुले चालतात. त्या आधारे विविध अभ्यासक्रमांना आणि संशोधनाला वाहिलेले ७३ विभाग विद्यार्थी आणि संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यापीठाने मुक्तसर, लुधियाना, होशियारपूर व कौनी येथे आपली विभागीय केंद्रे उभारली आहेत. विद्यापीठाच्या संकुलामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने एकूण १७ वसतीगृहे उभारली आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठीची ८, तर विद्याíथनींसाठीची ९ वसतीगृहे समाविष्ट आहेत. त्याशिवाय एक वìकग वुमेन होस्टेल आणि २ स्पोर्ट्स होस्टेल्सही विद्यापीठाने उभारली आहेत. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. सी. जोशी यांच्या नावाने विद्यापीठाचे मुख्य ग्रंथालय ओळखले जाते. पाच मजली इमारतीमध्ये असलेल्या या ग्रंथालयामध्ये पाचशे विद्यार्थी एकाचवेळी बसून अभ्यास करू शकतील अशा सुविधा पुरविल्या जातात. सात लाखांहून अधिक पुस्तकांचा संग्रह हे या ग्रंथालयाचे वैशिष्टय़ ठरते. विद्यापीठ ‘ज्योतिर्गमय ९१.२’ हे स्वत:चे कम्युनिटी रेडिओ सेंटरही चालविते.

विभाग आणि अभ्यासक्रम – विद्यापीठामध्ये कला, विज्ञान, भाषा, कायदा, शिक्षण आणि प्रयोगजीवी कला, व्यवसाय व्यवस्थापन आणि वाणिज्य, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, औषधनिर्मिती शास्त्र आणि दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन आणि कृषी या विद्याशाखांच्या अंतर्गत विविध विभाग आणि त्यांचे अभ्यासक्रम चालतात. कला विद्याशाखेंतर्गत सेंटर फॉर पोलीस अडमिनिस्ट्रेशन विभागामध्ये एम. ए., एम. फिल आणि पीएच.डी.चे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पोलीस दलात कार्यरत असणाऱ्यांसाठी या अभ्यासक्रमात विशेष सुविधा दिल्या जातात. डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स अँड नॅशनल सिक्युरिटी स्टडिजमध्ये एम. ए., एम. फिल आणि पीएच.डी. अभ्यासक्रमांच्या जोडीने डिझास्टर मॅनेजमेंट अँड सिक्युरिटी व होमलँड सिक्युरिटी या दोन विषयांमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालतात. भूगोल विभागामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट या विषयामधील स्वतंत्र एम. ए. आणि पीएच.डी. अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. डिपार्टमेंट ऑफ गुरू नानक शिख स्टडिज अंतर्गत एम. ए. कंपॅरेटिव्ह स्टडिज ऑफ रिलिजन हा अभ्यासक्रम चालतो. डिपार्टमेंट ऑफ सोशल सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये याच विषयामधील बी. ए. ऑनर्स आणि एम. ए. हे एकत्रितरीत्या पाच वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम शिकणे शक्य आहे. स्कूल ऑफ कम्युनिकेशन स्टडिजमध्ये अडव्हर्टायजिंग अँड पब्लिक रिलेशन्स या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्वतंत्र केंद्राचा दर्जा असणाऱ्या विमेन्स स्टडिज अँड डेव्हलपमेंट विभागामध्ये पारंपरिक एम. ए. अभ्यासक्रमाच्या जोडीने याच विषयामधील पदव्युत्तर पदविका, गव्हर्नन्स अँड लिडरशीप या विषयातील एम. ए. आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमही चालतो. युनिव्हर्सटिी इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट सायन्सेसच्या माध्यमातून रिटेल मॅनेजमेंट, बँकिंग अँड इन्शुरन्स मॅनेजमेंट, आयटी अँड टेलेकम्युनिकेशन मॅनेजमेंट, इन्फ्रास्ट्रक्चरल मॅनेजमेंट, फार्मास्युटिकल मॅनेजमेंट या विषयातील स्वतंत्र एमबीए अभ्यासक्रम चालविले जातात. युनिव्हर्सटिी इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंटमध्ये चार वर्षे कालावधीचे पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिक्षणशास्त्र विद्याशाखेंतर्गत डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी एज्युकेशन अँड डिसेबिलिटी स्टडिजमध्ये कम्युनिटी एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट या विषयातील एम.ए, लìनग डिसेबिलीटी विषयातील बी.एड. स्पेशल एज्युकेशन हे वेगळे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत डॉ. एस. एस. भटनागर युनिव्हर्सटिी इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल इंजिनीअिरग अँड टेक्नोलॉजीमध्ये ‘इंटिग्रेटेड बी.ई. – एमबीए’ हा पाच वर्षे कालावधीचा एकत्रित अभ्यासक्रम उपलब्ध आहे. इंजिनीअिरगच्या विविध विषयांमधील बी.ई., एम. ई.,आणि एम. टेकचे अभ्यासक्रमही हे विद्यापीठ चालविते. विज्ञान विद्याशाखेंतर्गत असणाऱ्या अँथ्रोपोलॉजी विभागामध्ये ‘डिप्लोमा इन फॉरेन्सिक सायन्स अँड क्रिमिनोलॉजी’ हा अभ्यासक्रम चालतो.

डिपार्टमेंट ऑफ इव्हिनिंग स्टडिजच्या माध्यमातून विविध सायंकालीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देत या विद्यापीठाने सामाजिक भान जपण्याचा अनोखा मार्ग निवडला आहे. याच जोडीने युनिव्हर्सटिी स्कूल ऑफ ओपन लìनगद्वारे विद्यापीठाने दूरशिक्षणाच्या मार्गाने वीस पारंपरिक तसेच व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू ठेवले आहेत. याशिवाय विद्यापीठाच्या इतर सर्व विभागांमधून नियमित पारंपरिक अभ्यासक्रमही चालविले जातात.

borateys@gmail.com

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panjab university
First published on: 25-09-2018 at 02:10 IST