मोठी मागणी असलेले आणखी एक क्षेत्र म्हणजे वैमानिकांचे. अनोखे, थरारक आणि उत्तम मोबदला देणाऱ्या या क्षेत्रातील अभ्यासक्रमाच्या संधी जाणून घेऊयात.
व्या वसायिक दृष्टीने आशिया खंडातील हवाई वाहतूक पुढील काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर वाढण्याचे संकेत आहेत. आशिया खंड हे मोठे व्यावसायिक व्यापारी केंद्र बनत असल्याने आपोआपच त्यामुळे विमानसेवेतही वृद्धी होत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीत वाढ होत असल्याने विमान कंपन्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी विमानसेवा सुरू होत आहेत. त्यामुळे वैमानिकांच्या मागणीतही वाढ संभवते.
आपल्या देशात नजीकच्या काळात २५०० पेक्षा अधिक वैमानिकांची गरज भासणार असून २०२० पर्यंत ८००० वैमानिकांची गरज भासण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हे लक्षात घेऊनच महत्त्वाकांक्षी युवावर्गाने या क्षेत्रात प्रशिक्षण घ्यायला हवे.
प्रशिक्षण संस्था
भारतीय हवाई दल :  महत्त्वाकांक्षी इच्छुक तरुणाई भारतीय वायुदलात प्रवेश करून शौर्य गाजवू शकते. अर्ज वायुसेनेकडे गेल्यानंतर प्रारंभिक चाचणीसाठी निवड मंडळामार्फत डेहराडून, म्हैसूर किंवा वाराणसी इथे बोलावण्यात येते. निवड झाल्यानंतर पायलट अ‍ॅप्टिटय़ूड बॅटरी टेस्ट द्यावी लागते. ही चाचणी पार पडली की- व्यक्तिमत्त्व चाचणी, दृष्टिकोन चाचणी (पिक्चर परसेप्शन अँड डिस्कशन टेस्ट), सायकॉलॉजिकल टेस्ट, समूह चर्चा, मुलाखत हे सर्व टप्पे पार करावे लागतात. वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली की विविध चाचण्यांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. उपलब्ध असलेल्या जागांनुसार गुणवत्ता यादीतील यशस्वी युवावर्गाला प्रशिक्षणासाठी बोलावले जाते. प्रशिक्षण ७४ आठवडय़ांचे असते. प्रशिक्षण काळात विद्यावेतन दरमहा आठ हजार रुपये दिले जाते. यासाठी अर्ज साध्या पोस्टानेच पोस्ट बॉक्स नंबर ००१ निर्माण भवन, पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठवावा. अर्जावर su ssc (w) F (p) course  असे ठळकपणे नमूद करावे.
अधिक माहितीसाठी http://www.careerair Force.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.                                          
इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अ‍ॅकॅडमी
या संस्थेने वैमानिकांचे प्रशिक्षण देणारी आपल्या देशातील महत्त्वाची संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. संस्थेतर्फे पुढील दोन अभ्यासक्रम चालवले जातात –
* कमर्शियल पायलट लायसन्स
* कमर्शियल हेलिकॉप्टर पायलट लायसन्स
या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण ‘आर २२ बी’ हेलिकॉप्टर्सवर दिले जाते.
कमर्शियल पायलट लायसन्स या अभ्यासक्रमाला २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. कमर्शियल हेलिकॉप्टर पायलट लायसन्स अभ्यासक्रमाला १० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी १८ महिने आहे. याशिवाय पुढील अभ्यासक्रम चालवले जातात-
* मल्टी इंजिन एन्डॉर्समेंट कोर्स
* इन्स्ट्रमेंट कोर्स
* सिम्युलेटर ट्रेनिंग कोर्स
* स्टँडर्डायझेशन कोर्स फॉर चीफ फ्लाइंग इन्स्ट्रक्टर
* इन्स्ट्रक्टर पायलट इन चार्ज ऑफ फ्लाइंग क्लब, ग्राऊंड ट्रेनिंग कोर्स
अर्हता : बारावी (गणित, भौतिकशास्त्र)
* प्रायव्हेट पायलट लायसन्स
अर्हता :  एकूण ६० तासांचा हवाई उड्डाणाचा किमान अनुभव, यापैकी ३० तास एकटय़ाने उड्डाण केलेले असावे.
निवड : उमेदवारांच्या निवडीसाठी लेखी परीक्षा दोन भागांत घेण्यात येते. सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निवडक विद्यार्थ्यांची अ‍ॅप्टिटय़ूड तपासणीसाठी चाचणी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते.
पत्ता : इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अ‍ॅकॅडमी, फुरसत गंज एअरफील्ड, रायबरेली-२२९३०२ उत्तर प्रदेश.
वेबसाइट : http://www.igrva.gov.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलाइड विंग्ज एव्हिएशन ट्रेनिंग सेंटर
या केंद्रात पुढील प्रशिक्षण मिळते-
* पायलट सीपीएल (कमर्शियल पायलट लायसन्स) ग्राऊंड ट्रेनिंग
कालावधी : १४ आठवडे
अर्हता : बारावी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह
वयोमर्यादा : १७ वर्षे/ वैद्यकीयदृष्टय़ा तंदुरुस्त
निवड :  अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट/ मुलाखतीद्वारे.
पत्ता : ७/८, अ‍ॅग्नेलो हाऊस, एस. व्ही. रोड, खार, मुंबई- ४०००५२.
वेबसाइट : http://www.alliedwings.in

More Stories onपायलटPilot
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pilot training
First published on: 31-03-2014 at 01:04 IST