जपानच्या इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रॉनॉटिकल सायन्सेस  आणि जपान एरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सी  यांच्यातर्फे अंतराळ विज्ञानातील विविध विद्याशाखांमध्ये उच्चस्तरीय संशोधन करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पाठय़वृत्तीविषयी..

अंतराळ विज्ञानातील (Space Science) जागतिक स्तरावरील जपानस्थित दोन प्रख्यात संशोधन संस्था ‘इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रॉनॉटिकल सायन्सेस’ (ISAS) आणि ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ (JAXA) यांच्याकडून संयुक्तपणे जपानमध्ये अंतराळ विज्ञानातील विविध विद्याशाखांमध्ये उच्चस्तरीय संशोधन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठय़वृत्ती दिली जाते. स्पेस सायन्समध्ये जगभरात अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी ही पाठय़वृत्ती ‘इंटरनॅशनल टॉप यंग फेलोशिप’(ITYF) या नावाने ओळखली जाते. दोन्ही संस्थांनी २०१३ साठी देण्यात येणाऱ्या या पाठय़वृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून ३१ ऑगस्ट २०१३ पूर्वी अर्ज मागवले आहेत.
पाठय़वृत्तीबद्दल :
२००९ सालापासून ISAS आणि JAXA यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दिली जाणारी ‘इंटरनॅशनल टॉप यंग फेलोशिप’ (ITYF) ही पाठय़वृत्ती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिमत्तेला आपल्याकडे आकर्षति करण्यासाठी जपानने उचललेले हे एक मोठे पाऊल आहे असे म्हणावे लागेल. विख्यात अशा दोन संशोधन संस्थांचे पाठबळ जरी कळा ला असले तरी मुख्यत्वे ही पाठय़वृत्ती ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ ( ITYF) कडून दिली जाते आणि पाठय़वृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रॉनॉटिकल सायन्सेस’ (JAXA) मध्ये अंतराळ विज्ञानातील विविध विद्याशाखांमध्ये उच्चस्तरीय संशोधन करण्याची संधी मिळते. कळा सारख्या जागतिक दर्जाच्या प्रतिष्ठित पाठय़वृत्तीच्या माध्यमातून जपानच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये एक सकारात्मक परिणामकारकता निर्माण करणे हा उपरोक्त दोन्ही संस्थांचा हेतू आहे. खअअ ची ही पाठय़वृत्ती मार्च २०१४ मध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षांसाठी आहे. पाठय़वृत्तीचा कालावधी तीन वर्षांचा असून पाठय़वृत्तीधारकाच्या गुणवत्तेवर तो आणखी दोन वर्षांसाठी (म्हणजे एकूण पाच वर्षांसाठी) वाढू शकतो. तसेच पाठय़वृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदाराला या संपूर्ण कालावधीसाठी दरमहा साधारणपणे सात लाख ५० हजार येन एवढे वेतन दिले जाईल. तसेच संशोधनाच्या एकूण कालावधीसाठी संस्थेकडून २५ लाख येन एवढा संशोधन निधी (Research Fund)ि दिला जातो, ज्यामध्ये संशोधनाशी संबंधित सर्व खर्चाचा समावेश आहे. अर्जदाराला विमा व इतर सामाजिक भत्तादेखील दिला जाईल.
आवश्यक अर्हता :
ही पाठय़वृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या पाठय़वृत्तीसाठी अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील पीएच.डी. अथवा समकक्ष पदवी असावी. तसेच त्याच्याकडे आठ वर्षांपेक्षा कमी कालावधीचा पोस्टडॉक्टरल संशोधनाचा अनुभव असावा. अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदाराचे जपानी भाषेवर प्रभुत्व असले तर उत्तमच अन्यथा त्याला संस्थेच्या आवारात जपानी भाषेचे प्रशिक्षण उपलब्ध केले जाईल.
अंतिम मुदत :
या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत
३१ ऑगस्ट २०१३ आहे.
महत्त्वाचे दुवे :
http://www.isas.jaxa.jp
ITYF2013@jaxa.jp

अर्ज प्रक्रिया :
या पाठय़वृत्तीसाठी अर्जदाराला त्याच्या अर्जाबरोबर त्याचे एस.ओ.पी.(Statement of Purpose), आवडीनिवडी, छंद, शिक्षण, शिक्षणेतर उपक्रम, कामाचा अनुभव इत्यादी बाबींनी सज्ज असा सी.व्ही., आतापर्यंतच्या त्याच्या संशोधनाची थोडक्यात मांडणी व त्याबरोबरच भविष्यातील त्याची स्वत:च्या संशोधनाची रूपरेषा आणि त्याच्या प्रकाशित झालेल्या आतापर्यंतच्या सर्व शोधनिबंधांच्या प्रती जोडाव्या लागतील. याबरोबरच अर्जदाराने त्याच्या अर्जात अर्जप्रक्रियेचा एक भाग म्हणून त्याला शिफारसपत्रे देणाऱ्या तीन तज्ज्ञांचे ई-मेल आयडीज नमूद करावेत. हे तीन तज्ज्ञ त्याच्या संशोधन पाश्र्वभूमीशी संबंधित असावेत आणि त्यांनी त्यांची शिफारसपत्रे अर्जदाराच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय थेट संस्थेच्या कळा2013@्नं७ं.्नस्र्  या ई-मेल आयडीवर मेल करावीत. अर्जदाराने अर्जासहित त्याची ही सर्व कागदपत्रे संस्थेच्या पत्त्यावर आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवेतर्फे पाठवून द्यावीत. पाठय़वृत्तीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत कळवण्यात येईल.