scorecardresearch

SEBI Recruitment 2022: भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळात १२० रिक्त पदांसाठी होणार भरती; लवकरात लवकर करा अर्ज

इच्छूक उमेदवार सेबी ग्रेड ए भरती प्रक्रिया २०२२ साठी sebi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन २४ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

sebi 2022
या रिक्त पदांसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत असा दोन टप्प्यांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. (प्रातिनिधिक फोटो)

भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाने (SEBI) ग्रेड ए पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छूक उमेदवार सेबी ग्रेड ए भरती प्रक्रिया २०२२ साठी sebi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन २४ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ५ जानेवारीपासून सुरु करण्यात आली आहे.

अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे एकूण १२० रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यात, सहाय्यक व्यवस्थापक (जनरल)च्या ८० जागा, सहाय्यक व्यवस्थापक (कायदेशीर) च्या १६ जागा, सहाय्यक व्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) १४ पदे, संशोधनाची ७ पदे आणि राजभाषेची ३ पदे आहेत. या रिक्त पदांसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा दोन टप्प्यांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

SBI Recruitment 2022: स्टेट बँकेत ‘या’ पदांसाठी होणार भरती, पगार ८० हजारांपेक्षा जास्त

भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळात या रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवाराने संबंधित विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. याशिवाय भरतीसाठी उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निर्धारित करण्यात आली असल्याने तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

सर्व पात्र उमेदवार सेबी सहाय्यक व्यवस्थापक पद भरती २०२२साठी अधिकृत संकेतस्थळ sebi.gov.in वर २४ जानेवारी २०२२पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, एससी/एसटी आणि पीडब्ल्यूबीडी श्रेणीतील उमेदवारांना १०० रुपये भरावे लागतील. उमेदवाराने अर्ज करण्याआधी अधिसूचनेतून आपली पात्रता पडताळून पाहावी. अधिक माहितीकरिता उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sebi recruitment 2022 120 vacancies know how much application fee will have to be paid pvp

ताज्या बातम्या