एमपीएससी मंत्र

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहिणी शहा

राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या पेपर एक सामान्य अध्ययनच्या तयारीबाबत या लेखापासून चर्चा करण्यात येत आहे. सामान्य अध्ययनामधील इतिहास घटकाचे मागील तीन वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि त्या अनुषंगाने अभ्यास करताना विचारात घ्यायचे मुद्दे याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. या घटकावर मागील तीन वर्षांमध्ये विचारलेले प्रातिनिधिक प्रश्न पाहू. योग्य उत्तराचा पर्याय ठळक केला आहे.

प्रश्न १.  पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे?

(a)  ते सातारा जिल्ह्यतील काले गावचे होते.

(b)  त्यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले होते.

(c)  महाराष्ट्रातील जनतेवर त्यांच्या ‘जलशां’चा खूप परिणाम झाला होता.

(d)  ते बहुजन समाजाला त्यांच्या दयनीय अवस्थेची, त्यांच्यातील शिक्षणाच्या अभावाची जाणीव करून देत.

पर्यायी उत्तरे :

१) केशवराव विचारे   २) रामचंद्र घाडगे

३) भाऊराव पाटील   ४) कृष्णराव भालेकर

प्रश्न २. पुढील घटनांची त्यांच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा.

अ.  ढाक्यात मुस्लीम लीगची स्थापना

ब.  खुदीराम बोस यांचा देहान्त करण्यात आला.

क.  लॉर्ड हार्डिग्जवर बॉम्ब फेकला.

ड.  सर प्रफुल्लचंद्र चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरविण्यात आली.

पर्यायी उत्तरे

१) अ, ब, क, ड २) ब, अ, ड, क

३) अ, ब, ड, क ४) अ, ड, ब, क

प्रश्न ३. टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगापट्टणच्या तहात पुढीलपैकी कोणती तरतूद नव्हती?

१) टिपूने युद्धखर्च म्हणून इंग्रजांना साडेतीन कोटी द्यावेत.

२) टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे.

३) टिपूची दोन मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील.

४) टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा.

प्रश्न ४. खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्यायाची निवड करा.

अ. मोगलकालीन स्थापत्य कला भारतीय शैलीची आहे.

ब. मोगलकालीन स्थापत्य कलेवर पर्शियन व हिंदू अशा दोन्ही कलांचा प्रभाव आहे.

क. मोगलकालीन स्थापत्य कलेवर विदेशी प्रभाव आहे.

ड. मोगलकालीन स्थापत्य शैलीवर कोणाचाच प्रभाव नाही.

पर्यायी उत्तरे

१) ‘अ’ विधान बरोबर आणि ‘ब’, ‘क’, ‘ड’ चुकीची

२) ‘ब’ आणि ‘ड’ विधाने बरोबर तर ‘क’ आणि ‘ड’ चुकीची

३) ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ विधाने बरोबर असून ‘ड’ चुकीचे

४) ‘ड’ विधान बरोबर तर ‘अ’, ‘ब’, ‘क’ चुकीची

प्रश्न  ५. जोडय़ा जुळवा :

अ. कामरुपचा राजा

ब. सिंधचा राज्यकर्ता

क. काश्मीरचा राजा

ड. वलभीचा राजा

पर्यायी उत्तरे

१) अ- कक, ब- क, क- ककक, ड- कश्   

२) अ- कक, ब- क, क- कश्, ड- ककक

३) अ- क, ब- कक, क- ककक, ड- कश्   

४) अ- कश्, ब- ककक, क- कक, ड- क

प्रश्न ६. खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या ‘धम्म’ ची माहिती आहे?

१) छोटे शिलालेख    २) भाब्रु शिलालेख

३) कलिंग शिलालेख  ४) चौदा शिलालेख

प्रश्न ७. खालील विधानांचा विचार करा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा.

अ. महाराष्ट्रातील जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांडोली, सोनगांव, इनामगांव, प्रकाशे, नाशिक, इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.

ब. राजस्थानमध्ये आहार व गिलुंड, मध्य प्रदेशातील माळवा, कायथा, एरण, इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.

पर्यायी उत्तरे

१) दोन्ही विधाने बरोबर आहेत.

२) दोन्ही विधाने चुकीची आहेत.

३) विधान ‘अ’ बरोबर आहे  परंतु विधान ‘ब’ चुकीचे आहे.

४) विधान ‘ब’ बरोबर आहे  परंतु विधान ‘अ’ चुकीचे आहे.

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून तयारी करताना पुढील मुद्दे लक्षात घ्यावे लागतील.

  •   एकूण १५ प्रश्नांपैकी प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक कालखंडासाठीची प्रश्नसंख्या निश्चित नाही. त्यामुळे सर्व कालखंडांची तयारी गांभीर्याने करणे गरजेचे आहे. मात्र आधुनिक कालखंडातील भारतीय राष्ट्रीय चळवळीचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख असल्याने याबाबतची तयारी जास्त बारकाईने करणे आवश्यक आहे.
  • प्राचीन इतिहासातील प्रश्नांमध्ये प्रागैतिहासिक इतिहासावरील प्रश्नांचाही समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक उत्खनन स्थळांवर भर देऊन भारतातील प्रागैतिहासिक इतिहासाचा आढावा घेणे पुरेसे ठरेल.
  • प्राचीन इतिहासाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे. यातील वैदिक, उत्तरवैदिक आणि संगम साहित्यावर आणि सिंधू संस्कृतीतील पुरातात्त्विक अवशेष यांवर प्रश्न विचारण्याचा भर जास्त आहे.
  • मध्ययुगीन इतिहासाच्या सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक पैलूंवर भर असला तरीही राजकीय इतिहासावरही प्रश्नांचा समावेश लक्षणीय आहे. उत्तर आणि दक्षिण भारतातील स्थापत्य आणि शिल्प आणि दृश्य कलांचा आढावा घेणे उपयुक्त ठरते.
  • आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रीय चळवळ हा भाग अभ्यासक्रमामध्ये स्वतंत्रपणे विहीत केलेला आहे. त्यामध्ये १८५७च्या ऊथावापासूनच्या स्वातंत्र्य चळवळी आणि त्या काळातील काँग्रेससह सर्व राजकीय पक्ष, संघटना, क्रांतिकारी चळवळी यांचा विचार करण्यात आलेला दिसतो.
  • आधुनिक काळातील स्वातंत्र्य चळवळीव्यतिरिक्त देशातील समाजसुधारणा, सामाजिक संस्था संघटना, आर्थिक प्रगती यांबाबतही प्रश्न समाविष्ट आहेत.
  • प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील राज्यकर्ते/ इतिहासकार/ साहित्यकार आणि आधुनिक कालखंडातील समाजसुधारक आणि राजकीय व्यक्तिमत्त्वे यांवर बहुविधानी प्रश्न विचारलेले दिसतात.   

या विश्लेषणाच्या आधारावर या घटकाची तयारी कशा प्रकारे करावी याची चर्चा पुढील लेखामध्ये करण्यात येत आहे.

Web Title: State service examination history questions ysh
First published on: 24-11-2021 at 00:03 IST