विद्यार्थ्यांना संशोधनपर विषयात काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे बंगळुरूच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेअंतर्गतच्या शिष्यवृत्तींसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक प्रवेशिका मागविण्यात येत आहेत-
गट एसए- अर्जदार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा विज्ञान विषय घेऊन व कमीत कमी ८० टक्के गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी ६० टक्के) उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात अकरावीच्या अभ्यासक्रमासाठी विज्ञान विषय घेऊन प्रवेश घेतलेला असावा.
गट एसएक्स- अर्जदार विद्यार्थ्यांनी २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात बारावीमध्ये विज्ञान विषयासह प्रवेश घेतलेला असावा व त्यांनी २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात विज्ञान विषयातील पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायला हवा.
गट एसबी- अर्जदार विद्यार्थ्यांनी २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात मूलभूत विज्ञान विषयातील पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्षांमध्ये प्रवेश घेतलेला असावा व त्यांच्या बारावीच्या गुणांची टक्केवारी कमीत कमी ८० टक्के (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के) असायला हवी.
शिष्यवृत्तीचे स्वरूप व तपशील- योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित गटवारीनुसार दरमहा ५००० ते ६००० रु. शिष्यवृत्ती देण्यात येईल. शिष्यवृत्तीची ही रक्कम त्यांना १ ऑगस्ट २०१४ पासून देण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क- अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून ५०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (केव्हीपीवाय- खाते क्र. १०२७०५७७३९२) मध्ये भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स- बंगळुरूच्या दूरध्वनी क्र. ०८०- २३६०१२१५ वर संपर्क साधावा अथवा http://www.kvpy.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१३ असून, विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि बँक चलनासह असणारे अर्ज दि कन्व्हेयर, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरू ५६००१२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१३.
ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर शिष्यवृत्तीसह विज्ञान व तंत्रज्ञान विषयात शिक्षण घ्यायचे असेल अशांनी या शिष्यवृत्ती योजनेचा जरूर फायदा घ्यावा.  

challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य