काही लोक हे इतरांपेक्षा जास्त यशस्वी का असतात, हे ठरवण्यासाठी गेल्या वर्षांमध्ये अनेक अध्ययने करण्यात आली. यशासाठीचे सर्वसामान्य घटक शोधण्यासाठी विक्री क्षेत्रातील लाखो लोक, कामगार वर्ग आणि व्यवस्थापक यांच्या मुलाखती व परीक्षा घेतल्या गेल्या आणि त्याचा अभ्यास करण्यात आला. यशासाठी आवश्यक अशा सर्वात महत्त्वाच्या गुणांपैकी पुन:पुन्हा हाती आलेला एक गुण म्हणजे ‘क्रियाभिमुखता’.
यशस्वी लोक हे अत्यंत क्रियाभिमुख असतात. ते अयशस्वी लोकांपेक्षा वेगाने हालचाली करतात असे दिसते. ते जास्त कार्यमग्न असतात. ते जास्त आणि अधिक कठोरपणे प्रयत्न करतात. ते थोडी लवकर सुरुवात करून थोडय़ा उशिरापर्यंत काम करतात. ते सतत गतिशील असतात.
दुसरीकडे, अयशस्वी लोक, गरजेच्या शेवटच्या क्षणी सुरुवात करतात आणि शक्य त्या पहिल्या क्षणी प्रयत्न करायचे सोडून देतात. ते कॉफी ब्रेक, जेवणाची सुटी, सुट्टय़ा यांच्या प्रत्येक मिनिटाबाबत पक्के असतात. ‘मी जेव्हा कामाच्या ठिकाणी नसतो, तेव्हा मी कामाबद्दल कधीच विचार करत नाही,’ अशी बढाई ते मारतात.
राल्फ वाल्डो इमर्सनने त्यांच्या ‘कॉम्पेनसेशन’ या प्रसिद्ध निबंधात लिहिले आहे की, तुमच्या आयुष्यात नेहमीच तुम्हाला योगदानाच्या मूल्याच्या समप्रमाणात भरपाई मिळेल. जर तुम्हाला तुमच्या पारितोषिकांचा आकार मोठा करायचा असेल तर तुम्ही देत असलेल्या परिणामांची गुणवत्ता आणि प्रमाण तुम्ही वाढवायलाच हवे.
अगदी तळापासून आणि कफल्लक अशा अवस्थेत सुरुवात करणाऱ्या यशस्वी लोकांचा नेपोलिअन हिल यांना सापडलेला कळीचा गुण म्हणजे त्यांनी आयुष्यात सुरुवातीलाच ‘एक मैल अधिक पुढे जाण्याची’ सवय लावून घेतली होती. जुन्या म्हणीप्रमाणे त्यांना शोध लागला होता. ‘त्या अतिरिक्त मैलावर कधीच कुठला वाहतुकीचा खोळंबा नसतो.’
गोल्स – ब्रायन ट्रेसी, अनुवाद – गीतांजली गीते, साकेत प्रकाशन,
पृष्ठे – २५६, मूल्य – २२५ रु.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The secret of success
First published on: 09-12-2013 at 07:40 IST