माणसाचं जगणं हे विचारांचं दृश्यरूप असतं.. प्रतिरूप असतं. आयुष्य म्हणजे जणू चांगल्या-चुकीच्या विचारांचाच प्रवास असतो. विचारांमधूनच शिकण्याची.. कृतींची.. आंतरिक बदलांची प्रक्रिया घडत व्यक्तिमत्त्वाची जडण होत असते. त्यासाठी विचारांना आचारांची आणि प्रयत्नांची जोड हवी असते.
‘पेरिले तसे उगवते’ या निसर्ग-नियमानुसारच विचारांचा परिणाम होत असतो. सकारात्मक आणि कृतीशील विचारांच्या पेरणीतूनच यश मिळत
असतं.
‘मनुष्य स्वतविषयी जसा मनोमन विचार करतो; तसाच घडत असतो,’ हे जीवनसूत्राप्रमाणे प्रत्येक कृतीमागे कळत नकळत केलेला विचार वा अविचार कारणीभूत असतोच. या विचारांचा व्यक्तीच्या स्वभावावर, प्रवृत्तीवर
आणि जगण्यावर कायमचा ठसा उमटत असतो. त्यातूनच समाजमनामध्ये प्रत्येक व्यक्तीची प्रतिमा तयार होत असते. जनमानसात एक वेगळी ओळख निर्माण होत असते.
यशाचं गमकच विचार करण्याच्या पद्धतीत दडलेलं.. सामावलेलं आहे, हे ज्या व्यक्तीला उमगतं ती सातत्यानं यशाचाच.. सकारात्मक पद्धतीनं विचार करत असते. अथकपणे समस्यांवर मात करत यशाचं शिखर गाठत असते. त्याकरिता ‘आयुष्य का आणि कसं जगायचं,’ ही विचारांची बांधणी पक्की हवी.
आपल्या मनातल्या एकलव्याची निष्ठा आणि अर्जुनाची दृष्टी ओळखायला हवी. घर विणणाऱ्या कोळ्याची जिद्दही अंगी बाणवायला हवी. शब्दांतून विचार, विचारांतून कृती आणि कृतीतून स्वप्न आकारात असतं..
स्वतच्या क्षमता, सुप्तगुण, इच्छाशक्ती, चिकाटी, दृढविश्वास या अंगभूत सामर्थ्यांच्या बळावरच मनातलं स्वप्न साकार होत असतं. फक्त आपल्यातल्या उणिवा आणि मर्यादांचं भान राखायला हवं. विचारांचं अक्षयदान जपायला हवं. कारण व्यक्तीचे विचार चिरंतन असतात.
विचार व्यक्तित्वाला चेहरा देत असतात. विचार जगण्याला अर्थ देत असतात. विचार स्वप्नाला मूर्त रूप देत असतात..
म्हणूनच ‘विचारांचं सामथ्र्य कळलेली माणसं; जगावर सत्ता गाजवत असतात.’
८ ८ प्रा. विजय जामसंडेकर
५्र्नं८्नंे२ंल्लीि‘ं१@८ंँ.ूे
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2013 रोजी प्रकाशित
विचार
माणसाचं जगणं हे विचारांचं दृश्यरूप असतं.. प्रतिरूप असतं. आयुष्य म्हणजे जणू चांगल्या-चुकीच्या विचारांचाच प्रवास असतो. विचारांमधूनच शिकण्याची.. कृतींची.. आंतरिक बदलांची प्रक्रिया घडत व्यक्तिमत्त्वाची जडण होत असते. त्यासाठी विचारांना आचारांची आणि प्रयत्नांची जोड हवी असते.
First published on: 04-02-2013 at 12:06 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thought