प्रवीण चौगले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रस्तुत लेखामध्ये आपण घटनात्मक व बिगर घटनात्मक संस्था आणि आयोग यांच्याविषयी चर्चा करणार आहोत. राज्यघटनेमध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या मुख्य संस्थांशिवाय इतर काही संस्था वा यंत्रणा यांची तरतूद आढळते. त्यांना घटनात्मक आयोग, संस्था असे म्हटले जाते. याशिवाय राज्य घटनेच्या आगामी वाटचालीत काळानुरूप काही इतर संस्था, आयोग स्थापन करण्याची आवश्यकता निर्माण झाली. या अनुषंगाने संसद वा कार्यकारी मंडळ यांनी स्थापन केलेल्या संस्था, आयोग यांचा उल्लेख बिगर घटनात्मक आयोग असा करण्यात आलेला आहे. घटनात्मक आयोगामध्ये महालेखापाल, महाधिवक्ता, निवडणूक आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, एससी/एसटी आयोग, वित्त आयोग तर बिगर घटनात्मक आयोगांमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, दक्षता आयोग, माहिती आयोग, आयआरडीए, हरित न्यायाधिकरण, महिला आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, स्पर्धा आयोग इत्यादींचा समावेश आहे. यातील काही आयोग, संस्था यांची यूपीएससीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने माहिती घेऊयात.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc exam preparation tips upsc exam preparation strategy zws 70
First published on: 26-05-2022 at 01:19 IST