श्रीकांत जाधव

आर्थिक आणि सामाजिक विकास या घटकावर विचारण्यात आलेले प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूप ग्राह्य धरून तसेच याला समकालीन घडामोडींची सांगड घालून विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे या घटकाचे योग्य आकलन करून संबंधित मुद्याविषयी वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन करून अभ्यास करणे अधिक उपयुक्त ठरणारे आहे. या घटकावर बहुपर्यायी (MCQ) पद्धतीचे प्रश्न अधिक विचारले जातात. प्रस्तुत लेखात शाश्वत विकास, गरिबी, समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी नमूद मुद्यांवरील गतवर्षीय पूर्वपरीक्षांमध्ये (२०११ ते २०२१) विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांचा आढावा घेणार आहोत.

High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
land reform
UPSC-MPSC : भारतामध्ये जमीन सुधारणांची गरज का पडली? त्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?

२०२१ मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न

नागरी सहकारी बँक, वॉटर क्रेडिट (Water Credit) इत्यादी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

२०२० मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न

आधार कार्डमधील माहिती व सामायिकीरण (Sharing), 1991 नंतरचे आर्थिक उदारीकरण व ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील रोजगारवृद्धी व घट, किसान क्रेडिट कार्ड इत्यादीवर थेट प्रश्न विचारण्यात आलेले होते व हे प्रश्न मूलभूत माहिती आणि समकालीन घडामोडी यांची योग्य माहिती आणि समज असल्याशिवाय सोडविता येऊ शकत नाहीत.

२०१९ मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न

The Global competitiveness Report कोण प्रकाशित करते हा प्रश्न विचारण्यात आला होता व यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, संयुक्त राष्ट्रांची व्यापार आणि विकास परिषद (UNCTAD), वल्र्ड इकॉनॉमिक फोरम आणि जागतिक बँक असे पर्याय देण्यात आले होते.

*  Atal Innovation Mission  कोणाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेले आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता आणि यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, कामगार आणि रोजगार मंत्रालय, निती आयोग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय असे पर्याय देण्यात आलेले होते.

* भारतात एखाद्या दिल्या गेलेल्या वर्षांमध्ये अधिकृत गरिबी रेषा (Official Poverty Line) काही राज्यांमध्ये अधिक आहे तर काही राज्यांत कमी आहे, असे का? असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि यासाठी गरिबी दर हा राज्या-राज्यामध्ये वेगळा असतो, किमतींचा स्तर राज्या-राज्यामध्ये वेगळा असतो, स्थूल राज्य उत्पादन राज्या-राज्यामध्ये वेगळे असते आणि सार्वजनिक वितरण प्रणालीची गुणवत्ता राज्या-राज्यामध्ये वेगळी असते असे पर्याय देण्यात आलेले होते.

२०१८ मधील काही प्रश्न

२०११ मध्ये ‘‘खालीलपैकी कोण सरकारच्या सर्वसमावेशक वाढीच्या उद्देशाला साहाय्यकारी ठरू शकते?’’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

२०१२ मध्ये ‘‘Oxford Poverty and Human Development Initiative यांनी  UNDP  च्या मदतीने विकसित केलेल्या  Multi Dimensional Poverty Index यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव आहे?’’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

२०१३ मध्ये ‘‘जनसांख्यिकी लाभांशचे संपूर्ण फायदे प्राप्त करण्यासाठी भारताने काय करणे क्रमप्राप्त आहे?’’.

२०१५ मध्ये  Bio Carbon Fund Initiative for Sustainable Forest Landscape हा फंड कोण व्यवस्थापित करते, आणि   Rio 20  Conferenceकाय आहे? असे दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते.

२०१६ मध्ये  SWAYAM या भारत सरकारच्या उपक्रमावर प्रश्न विचारण्यात आलेला होता व या उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे हे दिलेल्या पर्यायतून निवडायचे होते.

२०१७ मध्ये National Nutrition Mission ची उद्दिष्टे काय आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

२०१८ मध्ये मानवी भांडवल (Human Capital) यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. या घटकाची परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीचे इयत्ता ११ वीचे Indian Economic Development आणि इयत्ता १२ वीचे  Macro Economics ही पुस्तके वाचावीत ज्यामुळे या घटकाच्या मूलभूत माहितीचे आकलन व समज विकसित करण्यासाठी मदत होते. या घटकाची र्सवकष आणि सखोल परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी बाजारामध्ये अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. यातील उमा कापिला लिखित  Indian Economy:  Economic Development and Policy, दत्त आणि सुंदरम लिखित  Indian Economyहे संदर्भ ग्रंथ उपयुक्त ठरतात. या घटकाशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी योजना मासिक आणि लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही वर्तमानपत्रे तसेच केंद्र सरकारद्वारे प्रकाशित करण्यात येणारा आर्थिक पाहणी अहवाल इत्यादी अभ्यासणे गरजेचे आहे. पुढील लेखामध्ये आपण आर्थिक विकास या घटकाअंतर्गत येणारे कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रे, औद्योगिक क्षेत्र, पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, भारतीय वित्तीय प्रणाली, भारताचा परकीय व्यापार इत्यादी घटकांवर गतवर्षीय पूर्व परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि या मुद्दय़ाची परीक्षाभिमुख तयारी कशी करावी, याची एकत्रित चर्चा करणार आहोत.