इंडियन प्लायवुड इंडस्ट्रीज रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बंगळूरू येथील वुड अ‍ॅण्ड पॅनल प्रॉडक्टस् टेक्नॉलॉजी या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्यानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार बीएससी पात्रताधारक असावेत अथवा त्यांनी अभियांत्रिकी विषयातील पदवी घेतलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय  १-११-२०१३ रोजी २८ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची निवड त्यांच्या संबंधित पदवी परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन प्लायवुड इंडस्ट्रीज रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बंगळुरू येथे नोव्हेंबर २०१३ मध्ये सुरू होणाऱ्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन प्लायवुड इंडस्ट्रीज रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटच्या दूरध्वनी क्र. ०८०-३०५३४०२१ अथवा २८३९५९७० वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या ६६६.्रस्र्१३्र.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले विहित नमून्यातील प्रवेश अर्ज आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, इंडियन प्लायवुड इंडस्ट्रीज रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, एचएमटी लिंक रोड, ऑफ तुमकूर रोड, पोस्ट ऑफिस यशवंतपूर, बंगळरू ५६००२२ या पत्त्यावर ५ सप्टेंबर २०१३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.