डॉ. श्रीराम गीत

मी सध्या बी. फार्म. यात प्रथम वर्षांत आहे, तर मला हे घ्यायचे होते की मला पुढे आणखी कोणत्या क्षेत्रात करियर करण्याच्या संधी आहेत. कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. – पृथ्वीराज कोकाटे

Assistant Police Inspector promoted soon
आनंदाची बातमी! सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मित्रा, तुझी अजून तीन वर्षे शिकण्याची आहेत. पहिल्या वर्षांची सुरुवात फक्त झाली आहे. दरवर्षी उत्तम सीजीपी टिकवणे, साडेआठच्या पुढे ठेवणे यावर फक्त लक्ष केंद्रित करावेस. तू विचारलेला प्रश्न हा शेवटच्या वर्षांत गेल्यावर विचारण्याचा आहे. म्हणून त्याचे उत्तर आत्ता देत नाही. कोणत्याही पदवीच्या पहिल्या वर्षांत प्रवेश घेतल्या घेतल्या असे प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती फारसे काही लागत नाही, कारण पुढे काय? अधिक काय? चांगले काय? खूप पैसे देणारे काय? भारतात काय? परदेशात काय? यावरच त्यांचे लक्ष केंद्रित होते. मूळ पदवीचा अभ्यास बाजूला पडतो. सखोल ज्ञान घेणे दुर्लक्षित होते. अशा वरवरच्या घेतलेल्या पदवीनंतर करिअरचा पूर्ण पाया ठिसूळ होतो. यंदाचे वर्षी पदवीला प्रवेश घेतलेल्या साऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांकरिता इतके सविस्तर लिहिले आहे.

ल्ल मला दहावीला ८६ टक्के मार्क होते. बारावी सायन्स चांगल्या मार्काने केले. पण घरच्यांची संमती नसल्यामुळे बीएससी ला प्रवेश घेऊनही सायन्स सोडावे लागले. मी घरात सगळय़ात मोठी आहे. सध्या माझे वय २४, लहान बहिणींची लग्न झाली आहेत. रिसेप्शनिस्ट म्हणून एका ठिकाणी मी काम करत आहे. एकीकडे मुक्त विद्यापीठातून बी.ए. पूर्ण होत आले आहे. मला एमपीएससीची परीक्षा देण्याची इच्छा आहे पण अभ्यासाला सुरुवात कशी करू कुठून करू हे कळत नाही. स्वत: पुरते मिळवत या परीक्षेत यश मिळवण्याचे ध्येय आहे. —मोनिका गावडे

बीएच्या तुझ्या विषयांशी संबंधितच एमपीएससीचा अभ्यासक्रम असतो. शालेय अभ्यासक्रमातील पाचवी ते बारावीची सर्व विषयांची पुस्तके वाचून काढणे, त्याच्या नोट्स काढणे ही सुरुवात असते. पूर्व परीक्षेचा सगळा अभ्यास यावर आधारित असतो.

बीए पूर्ण होईल तोवर हे सगळे करणे तुला सहज शक्य आहे. करियर वृत्तांतचे रोजचे वाचन कायम चालू ठेवावे. अग्रलेख नियमितपणे वाचावेत. मनाची पूर्ण खात्री झाल्यावर पहिला प्रयत्न एमपीएससीचा करावा. त्यात कुठपर्यंत यश येते हे बघून मग क्लास लावायची गरज आहे की नाही हे ठरवता येते. चिकाटी ,सातत्य, सर्वागीण अभ्यास ही किमान तीन प्रयत्नात यश मिळवण्याची त्रिसूत्री आहे असे समजायला हरकत नाही. त्यासाठी शुभेच्छा.

मी २०२३ ला बी कॉम ६९.८४ मार्काने झालो आहे. बारावीला ६३.८५ आहे. तर मला एमपीएससी मधून एसटीआय होण्याचं स्वप्न आहे. तरी पण प्लॅन बी म्हणून लॉ करावे वाटते व त्यानंतरच्या करियरच्या संधी याबद्दल— गोरख चोरमले.     

एमपीएससी करण्याचे स्वप्न सगळय़ांचे असते. परीक्षेला अनेकदा बसून सुद्धा त्यातील एक टक्क्यांनाच यश मिळते. ज्यांनी प्लॅन बीचा नीट विचार केला आहे. त्यांना त्यात कधीच अडचण येत नाही. मनात आल्याप्रमाणे एल.एल.बी.ला सुरुवात कर. एल.एल.बी. करत असताना दर रविवारी एक तास एमपीएससीचा अभ्यास काय असतो यावर विचार कर. तो झेपत असेल तर पदवीनंतर तुला प्रयत्न करता येईल. अन्यथा वकील झाल्यानंतर कायदा क्षेत्रातील जज्ज बनण्यासाठीची परीक्षा देऊन तुला यश मिळवता येईलच.