Railway Recruitment 2023 : भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railway) नोकरी करण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. यासाठी दक्षिण मध्य रेल्वेमध्ये ज्युनिअर टेक्निकल असोसिएटमध्ये पदावर भरतीसाठी अधिसुचना जाहीर केली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार ३० जून २०२३पर्यंत किंवा त्याच्या आधी ऑफलाईन अर्ज करू शकतात. त्यांना आपला अर्ज SCR ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये जमा करावे लागेल.

या भरतीमध्ये प्रक्रियामध्ये एकूण ३५ पदांसाठी भरती होणार आहे. उमेदवार या पदांवर अर्ज भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट scr.indianrailways.gov.in वरुन डाऊनलोड करु शकतात. जे उमेदवार या पदावर अर्ज करू इच्छित आहे त्यांनी खाली दिलेली सर्व माहिती दिलेली व्यवस्थित वाचावी.

Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!
SAI recruitment 2024 job post
SAI recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी! मिळणार ‘इतक्या’ लाखांचा पगार…
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
SECR Recruitment 2024 jobs at railway
SECR Recruitment 2024 : रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी मोठ्या संख्येने होणार भरती! अधिक माहिती पाहा

केव्हा अर्ज करू शकता.
उमेदवार या पदासाठी अर्ज ३० जून २०२३पर्यंत किंवा त्याच्या आधी करू शकतात.

हेही वाचा – RBI Grade B 2023 : रिझर्व्ह बँकेत २९१ पदांसाठी होणार भरती! अर्ज करण्याची शेवटची संधी, परीक्षेसाठी बदलू शकता शहर

काय शैक्षणिक पात्रता आहे.
ज्युनिअर टेक्निकल असोसिएट ( वर्क्स) ( कॉन्स्टेंट/ ओएल) या पदासाठी उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएटची पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनरिंगमध्ये बी. एससी पदवी असली पाहिजे. बॅचलर डिग्री मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/ इलेक्टॉनिक्स इंजिअरिंगमध्ये डिप्लोमा ( बी) मॅकेनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी कोणत्याही शाखेतून उतीर्ण असला पाहिजे.

ज्युनियर टेक्निकल असोसिएट एस अँड टी (ड्राईंग) (कॉन्स्टंट / ओएल) या पदासाठी उमेदवाराकडे (ए) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेक्नॉलॉजी / कम्युनिकेशन इंजिनीअरिंग / कॉम्प्युटर विज्ञान आणि इंजिनिअरिंग / कॉप्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा (बी) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / साठी कोणत्याही शाखेचे कॉम्बिनेशन / इलेक्टॉनिक्स/ इन्फॉर्मेशन टेक्नलॉजी/ कम्युनिकेशन इंजिनिअरिंग / कॉप्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी असली पाहिजे.

वयोमर्यादा
यूआर – १८-३३ वर्ष
ओबीसी – १८-३६ वर्ष
एससी/एसटी – १८-३८ वर्ष

हेही वाचा – IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदासाठी भरती सुरु, २० जूनपूर्वी करा अर्ज

अर्ज शुल्क (Railway Recruitment Application Fee)
एससी/एसटी/ओबीसी/महिला/अल्पसंख्यक/ईडब्ल्यूएससाठी अर्ज शुल्क २५० रुपये
इतर उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये

अशी होईल उमेदवाराची निवड
शिक्षण- ५५ गुण
अनुभव- ३० गुण
व्यक्तीमत्त्व/ बुद्धिमत्ता- १५ गुण

हेही वाचा – SBI Recruitment 2023: भारतीय स्टेट बँकेत २८ पदांसाठी होणार भरती, परीक्षेशिवाय होईल निवड, ७५ लाखांपर्यंत पॅकेज मिळणार

येथे पाहा अर्जाची लिंक आणि नोटिफिकेशन

Railway Recruitment 2023 अर्जाची लिंक -https://scr.indianrailways.gov.in/
Railway Recruitment 2023 नोटिफिकेशन -https://scr.indianrailways.gov.in/uploads/files/1685961214725-JTA_Notifn2023.pdf

या पत्यावर पाठवा अर्ज
योग्य आणि इच्छूक उमेदवार आपला अर्ज ‘प्रधान मुख्य कर्मचारी अधिकारी सेक्रेटरी आणि सीनियर कार्मिक अधिकारी (इंजिनिअरिंग), प्रधान मुख्य अधिकारी कार्यालय, चौथी मजला, कार्मिक विभाग, रेल्वे निलियम, दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद, पिन -५०००२५ पाठवू शकता आहेत.