तेल अविव : गाझाच्या अंदाजे ७५ टक्क्यांहून अधिक भागावर पूर्ण नियंत्रण मिळवले असून, ज्यामुळे हमासच्या दहशतवादी पायाभूत सुविधांवर परिणाम झाला. त्यांची आदेश साखळी उद्ध्वस्त झाली असून, ‘आयडीएफ’ला नियंत्रणाचा विस्तार करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे ‘इस्रायली संरक्षण दला’ने (आयडीएफ) बुधवारी म्हटले आहे.

‘आयडीएफ’ने बुधवारी ‘एक्स’ संदेशात तपशील प्रसृत केला. त्यात गाझामध्ये इस्रायली सैन्याने हल्ले सुरू केल्यापासून दोन हजार दहशतवाद्यांना ठार करण्याबरोबरच सुमारे १० हजार दहशतवादी ठिकाणांवर हल्ल्यांचा दावा केला आहे. ‘हमास’वर दबाव वाढवण्याची परिस्थिती निर्माण करण्यासाठी ‘कंट्रोल कॉरिडॉर’ची स्थापना करण्यात आली आहे.

इस्रायलविरुद्ध हल्ल्यांचे नियोजन करणाऱ्या वरिष्ठ हमास कमांडरसह सुमारे दोन हजार दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावाही ‘आयडीएफ’ने केला. हवाई, जमीन आणि समुद्रातून सुमारे १० हजार दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला, ज्यामुळे हमासच्या लष्करी पायाभूत सुविधा, शस्त्रास्त्रे आगार आणि भूमिगत जाळे उद्ध्वस्त झाले.