scorecardresearch

ISRO Recruitment 2023: वयाचं टेन्शन घेऊ नका! ISRO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, या पदांसाठी निघाली बंपर भरती

Job Opportunity in ISRO : इस्त्रोमध्ये नोकरी मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती.

ISRO Recruitment 2023
इस्त्रो भरती २०२३.

ISRO Recruitment 2023 for Medical Officer : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत चिकित्सा अधिकारी एसडी (जनरल सर्जरी) साठी वॅकेन्सी आहे. मेडिकल ऑफिसर पदासाठी योग्य उमेदवारांना अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आरक्षित नसलेल्या वर्गासाठी फक्त एकच रिक्त जागा आहे. इस्त्रोने याबाबत ऑफिशियल नोटिफिकेशन जारी केलं आहे. यानुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची अट नाहीय. निवड केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

इच्छुक उमेदवार ७ मार्च २०२३ किंवा त्याआधी SDSC SHAR या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करु शकतात. इस्त्रो भरती २०२३ नुसार मेडिकल ऑफिसर एसडी (जनरल सर्जरी) च्या रिक्त जागेसाठी अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची अट नाहीय. जनरल सर्जरीमध्ये M.B.B.S+MS/DNB मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया/स्टेट/नॅशनल मेडिकल कमीशनमधून मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे.

नक्की वाचा – Medical Education : डॉक्टर व्हायचंय! या ठिकाणी आहे सर्वात स्वस्त आणि मस्त मेडिकल एज्यूकेशन

निवड प्रक्रिया

शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीत कमीत कमी ६० टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना मेरिटच्या क्रमवारीत सूचीबद्ध करण्याचा विचार केला जाईल. मुलाखतीदरम्यान उमेदवारांना वेरिफिकेशनसाठी ऑनलाईन अर्जात समावेश केलेले सर्व प्रमाणपत्र आणि प्रशंसापत्रांची मूळ प्रत सादर करावी लागेल. ही कागदपत्रे नसल्यास त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.

अशी आहे अर्ज करण्याची प्रक्रिया?

इस्त्रो भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पात्रता निकषांना पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना एसडीएससी शार अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करु शकता. उमेदवारांना अर्ज भरताना २५० रुपये शुल्क भरावं लागेल. तर, एससी, एसटी,PWBD,Ex-servicemen ला फी भरावी लागणार नाही.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-02-2023 at 14:21 IST

संबंधित बातम्या