माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) (भारत सरकारचा उपक्रम), मुंबई – इंजिनीअरिंग डिप्लोमा, इंजिनीअरिंग पदवीधर आणि जनरल स्ट्रीम पदवीधर उमेदवारांची अॅप्रेंटिसशिप अॅक्ट (अमेंडमेंट) १९७३ अंतर्गत एकूण २०० अॅप्रेंटिसेस पदांची भरती. ( ADVT/ MDLATS/२/२०२४)

(I) इंजिनीअरिंग डिप्लोमा अॅप्रेंटिसेस – ३० पदे (अजा – ३, अज – २, इमाव – ९, ईडब्ल्यूएस् – २, एसईबीसी – २, खुला – १२).

(सिव्हील – ५, कॉम्प्युटर – ५, मेकॅनिकल – १०, इलेक्ट्रिकल – १०).

पात्रता : संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.

(II) इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस – १२० पदे (अजा – १५, अज – ८, इमाव – ३६, ईडब्ल्यूएस् – ११, एसईबीसी – ११, खुला – ३९).

(सिव्हील – १०, कॉम्प्युटर – ५, इलेक्ट्रिकल – २५, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन – १०, मेकॅनिकल – ६, शिपबिल्डींग टेक्नॉलॉजी किंवा इंजिनीअरिंग/ नेव्हल आर्किटेक्चर – १०).

पात्रता : संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी.

(III) जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस – ५० पदे (अजा – ६, अज – ३, इमाव – १५, ईडब्ल्यूएस् – ४, एसईबीसी – ४, खुला – १८) (बी.कॉम्./ बी.सी.ए. / बी.बी.ए./ बी.एस्.डब्ल्यू.).

पात्रता : संबंधित पदवी उत्तीर्ण.

उमेदवारांनी डिप्लोमा/पदवी परीक्षा १ एप्रिल २०२० नंतर उत्तीर्ण केलेली असावी.

MDL च्या वेबसाईटवरील जाहिरातीच्या Annexure- I मध्ये पात्रतेसाठी इंजिनिअरींग डिग्री आणि डिप्लोमाच्या संबंधित ब्रॅंचेसची यादी दिलेली आहे.

स्टायपेंड : दरमहा – १ वर्षाच्या अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग दरम्यान डिप्लोमा अॅप्रेंटिसेसना दरमहा रु. ८,०००/-, ग्रॅज्युएट्सना रु. ९,०००/-.

वयोमर्यादा : दि. १ मार्च २०२५ रोजी १८ ते २७ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

निवड पद्धती : प्राप्त अर्जांमधून पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार कागदपत्र पडताळणी आणि इंटरव्ह्यूसाठी बोलाविले जातील. निवड यादी बनविताना पात्रता परीक्षेतील गुणांसाठी ८० टक्के वेटेज आणि इंटरव्ह्यूकरिता २० टक्के वेटेज दिले जाईल.

शंकासमाधानासाठी mdlats@mazdock. com या ई-मेल आयडीवर किंवा टेलिफोन नंबर ०२२-२३७६४१५५ (वर सोमवार ते शुक्रवार सकाळी ८.३० ते संध्याकाळी ४.३० वाजेदरम्यान) संपर्क साधा.

ऑनलाइन अर्ज MDL वेबसाईट https:// mazagondock. in या संकेतस्थळावर दि. ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत करावेत.

MDL अॅप्रेंटिस पोर्टलवर पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. दि. ७ फेब्रुवारी २०२५.

पात्रता/अपात्रता संबंधित तक्रारी दाखल करण्याची अंतिम तारीख १३ फेब्रुवारी २०२५.

इंटरव्ह्यूसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा दिनांक १४ फेब्रुवारी २०२५.

इंटरव्ह्यू दि. १७ फेब्रुवारी २०२५ पासून घेतले जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

suhaspatil237@gmail.com