इंडियन कोस्ट गार्ड (ICG) (संरक्षण मंत्रालय) मध्ये असिस्टंट कमांडंट (ग्रुप-ए गॅझेटेड ऑफिसर) च्या एकूण १७० पदांवर पदवीधर पुरुष उमेदवारांची भरती. (२०२७ बॅच). ब्रँचनुसार रिक्त पदांचा तपशिल –

(१) असिस्टंट कमांडंट (जनरल ड्युटी) (पुरुष) – १४० पदे (अजा – २५, अज – २४, इमाव – ३५, ईडब्ल्यूएस – १०, खुला – ४६).

पात्रता – पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

१२ वीला फिजिक्स व मॅथेमॅटिक्स विषय अभ्यासलेले असावेत किंवा डिप्लोमानंतर पदवी उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना डिप्लोमा (मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स विषयासह) उत्तीर्ण.

(२) असिस्टंट कमांडंट-टेक्निकल (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) (फक्त पुरुष) – ३० पदे (अजा – ३, अज – ४, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ९, खुला – १३).

(अ) टेक्निकल मेकॅनिकल ब्रँच. पात्रता – (i) मेकॅनिकल/मरिन/नेव्हल आर्किटेक्चर/ऑटोमोटिव्ह/मेकॅट्रॉनिक्स/इंडस्ट्रियल अँड प्रोडक्शन/मेटॅलर्जी/डिझाईन/एअरोनॉटिकल/एअरोस्पेस विषयांतील इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण किंवा संबंधित डिसिप्लीनमधील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सकडील समतूल्य पात्रता.

(ब) टेक्निकल (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) ब्रँच. पात्रता – (i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेली कम्युनिकेशन/इन्स्ट्रूमेंटेशन/ इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/पॉवर इंजिनीअरिंग/पॉवर इलेक्ट्रॉनिक्स विषयांतील इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण किंवा संबंधित डिसिप्लीनमधील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सकडील समतूल्य पात्रता.

आणि (ii) १२ वीला फिजिक्स व मॅथेमॅटिक्स विषय अभ्यासलेले असावेत किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा (फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयांसह) उत्तीर्ण.

पदवीच्या अंतिम वर्षाचे उमेदवार (जे शेवटच्या सेमिस्टरपर्यंत सर्व विषयांत उत्तीर्ण आहेत.) ते अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना डिग्री सर्टिफिकेट दि. ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करावे लागेल.

शारीरिक मापदंड – उंची (जीडी/टेक्निकल पदांसाठी) – १५७ सें.मी., वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात – १० टक्के. छाती – योग्य प्रमाणात असावी आणि किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक. दृष्टी – असिस्टंट कमांडंट (जीडी) साठी – चष्म्याशिवाय – ६/६, ६/९, चष्म्यासह – ६/६, ६/६. असिस्टंट कमांडंट (टेक्निकल) साठी – चष्म्याशिवाय – ६/३६, ६/३६, चष्म्यासह – ६/६, ६/६.

वयोमर्यादा – जनरल ड्युटी आणि टेक्निकल ब्रँचसाठी २१ ते २५ वर्षे (१ जुलै २०२६ रोजी). उमेदवाराचा जन्म १ जुलै २००१ ते ३० जून २००५ दरम्यानचा असावा.

निवड पद्धती – स्टेज-१ – कोस्ट गार्ड कॉमन ॲडमिशन टेस्ट (CGCAT) कॉम्प्युटर बेस्ड् स्क्रीनिंग टेस्ट देशभरातील विविध केंद्रांवर १८ सप्टेंबर २०२५ रोजी घेतली जाईल. MCQ पॅटर्न १०० प्रश्न, ४०० गुणांसाठी, वेळ २ तास. (प्रत्येक प्रश्नाला ४ गुण असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.)

सर्व ब्रँचेसमधील पदांसाठी – (१) इंग्लिश, (२) रिझनिंग अँड न्यूमरिकल अॅबिलिटी, (३) जनरल सायन्स अँड मॅथेमॅटिकल ॲप्टिट्यूड, (४) जनरल नॉलेज प्रत्येकी २५ प्रश्न.

स्टेज-२ प्रीलिमिनरी सिलेक्शन बोर्ड (PSB) (गोवा, नोएडा, चेन्नई, गांधीनगर, शिलाँग/गुवाहाटी आणि कोलकता केंद्र) – CGCAT परीक्षेतील गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांची प्रीलिमिनरी सिलेक्शन एक्झामिनेशन नोव्हेंबर २०२५ मध्ये घेतली जाईल. (कॉम्प्युटराईज्ड्, कॉग्निटिव्ह बॅटरी टेस्ट (CCBT) (ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्टसाठी फक्त इंग्रजी माध्यम असेल.) आणि पिक्चर परसेप्शन अँड डिस्कशन टेस्ट (PP & DT) (उमेदवारांना हिंदीमधून बोलण्याची मुभा असेल.) यांचा समावेश असेल. ही फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

फोटो आणि बायोमेट्रिक तपासणी व कागदपत्र पडताळणी PSB केंद्रावर केली जाईल.

स्टेज-३ फायनल सिलेक्शन बोर्ड (FSB) फायनल सिलेक्शन – जानेवारी-ऑक्टोबर २०२६ दरम्यान CGSB नवी दिल्ली केंद्रावर (कालावधी ५ दिवस) होईल.

स्टेज-४ – मेडिकल एक्झामिनेशन – स्पेशल मेडिकल बोर्ड (SMB) (मार्च-एप्रिल २०२६) यातून अनफिट ठरलेल्या उमेदवारांना ४२ दिवसांच्या आत DGAFMS कडे डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल सर्व्हिसेस/CGHQ मार्फत अपिल करता येईल.

स्टेज-५ – स्टेज-१ व स्टेज-३ मधील एकत्रित गुणवत्तेनुसार ऑल इंडिया गुणवत्ता यादी बनविली जाईल. (डिसेंबर २०२६)

वेतन – असिस्टंट कमांडंट पदाकरिता वेतन ७ व्या केंद्रीय वेतन आयोगाप्रमाणे पे-लेव्हल – १० (मूळ वेतन रु. ५६,१००/- अधिक इतर भत्ते). अंदाजे वेतन दरमहा रु. १.२५ लाख, नाममात्र भाडे (लायसन्स फी) घेवून उमेदवारांना शासकीय निवास दिला जाईल.

ट्रेनिंग – इंडियन नेव्हल ॲकॅडमी इझिमाला, केरळ येथे निवडलेल्या उमेदवारांना २७ डिसेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या ४४ आठवड्यांच्या नेव्हल ओरिएंटेशन कोर्स ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल. त्यांचा १.२५ कोटी रुपयांचा विमा उतरविला जाईल.

अंतिम निवड यादी डिसेंबर, २०२६ च्या शेवटास इंडियन कोस्ट गार्डच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

पात्रता/निवड पद्धती इत्यादी विषयी शंकासमाधानासाठी ई-मेल/फोन नं. स्टेज-१, स्टेज-२, ४ व ५ साठी

dte-rectofficer@indiancoastguard.nic.in, फोन नं. ०१२०-२२०१३४०.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन/फी भरणे/ई-अॅडमिट कार्डविषयी शंकासमाधानासाठी icg-officers@cdac.in, फोन नं. ०२०-२५५०३१०८/१०९.

परीक्षा शुल्क – रु. ३००/-.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन अर्ज http://www.joinindiancoastguard.cdac.in या संकेतस्थळावर २३ जुलै २०२५ (२३.३० वाजे) पर्यंत करावेत.