सुहास पाटील

इंडियन आर्मी, झोनल रिक्रूटींग ऑफिस, पुणे – महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमणदीव आणि दादरा-नगरहवेलीमधील Domicile उमेदवारांची रिक्रूटींग इयर २०२४-२५ करिता ‘शिपाई फार्मा आणि सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट’ पदांवर पुरुष उमेदवारांची भरती. पदाचे नाव – (१) शिपाई फार्मा ( Sepoy Pharma)

Nagpur Lok Sabha, Nitin Gadkari,
गडकरी हॅटट्रिक साधणार ?
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Displeasure of office bearers in BJPs election planning meeting
अलिबाग : भाजपच्या निवडणूक नियोजन बैठकीतही पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर…
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर

पात्रता – १२ वी आणि फार्मसी डिप्लोमा किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा B. Pharm किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(उमेदवार स्टेट फार्मसी काऊन्सिल किंवा फार्मसी काऊन्सिल ऑफ इंडियाकडे रजिस्टर्ड असावा.)

वयोमर्यादा – (दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी) १९-२५ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. १ ऑक्टोबर १९९९ ते १ ऑक्टोबर २००५ दरम्यानचा असावा.)

(२) सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट

पात्रता – १२ वी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश किंवा १२ वी फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झूऑलॉजी आणि इंग्लिश विषयांसह सरासरी ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण. (प्रत्येक विषयात किमान ४० टक्के गुण आवश्यक)

१२ वीला बसलेले उमेदवार जे निकालाची वाट पहात आहेत, ते अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना निवड प्रक्रियेच्या फेज-२ दरम्यान १२ वी उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

वयोमर्यादा – (दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी) १७ १/२-२३ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. १ ऑक्टोबर २००१ ते १ एप्रिल २००७ दरम्यानचा असावा.)

दोन्ही पदांसाठी शारीरिक मापदंड – उंची – १६७ सें.मी. (गोवा राज्यातील उमेदवारांसाठी १६५ सें.मी.) अनुसूचित जमातीसाठी १६२.५ सें.मी. छाती – ७७-८२ सें.मी. वजन – आर्मी मेडिकल स्टँडर्डस JIA वेबसाईटवर दर्शविल्याप्रमाणे उंची आणि वय यांच्या प्रमाणात असावे.

शारीरिक मापदंड सूट – (अ) सैनिकाचा मुलगा ( SOS), माजी सैनिकाचा मुलगा ( SOEX), युद्धात कामी आलेल्या सैनिकाच्या विधवेचा मुलगा ( SOWW), माजी सैनिकाच्या विधवेचा मुलगा, युद्धात कामी आलेल्या सैनिकाच्या विधवेचा दत्तक पुत्र अथवा जावई (जर तिला मुलगा नसेल) इ. साठी उंचीत २ सें.मी., छातीमध्ये १ सें.मी. व वजनात २ कि.ग्रॅ. ची सूट दिली जाईल.

(ब) उत्कृष्ट खेळाडूंसाठी (खेळांची यादी जाहिरातीमधील Annexure- B मध्ये उपलब्ध आहे.) उंचीत २ सें.मी., छातीमध्ये ३ सें.मी. वजनात ५ कि.ग्रॅ. ची सूट दिली जाईल. (खेळाचे सर्टिफिकेट्स भरती रॅलीच्या पहिल्या दिवसापासून २ वर्षांपर्यंतच ग्राह्य धरले जातील.)

निवड प्रक्रियेमध्ये पुढील कॅटेगरीच्या उमेदवारांना बोनस गुण दिले जातील.

(१) SOS/ SOEX/ SOWW/ SOW (फक्त एकाच मुलाला) – २० गुण, (२) भारत देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केलेला खेळाडू – २० गुण, (३) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केलेला खेळाडू ज्याने वैयक्तिक खेळामध्ये पदक मिळविले आहे किंवा टीम इव्हेंटमध्ये ८ वे स्थान मिळविले आहे – १५ गुण, (४) आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत कॉलेजचे/ विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेला खेळाडू ज्याने वैयक्तिक खेळामध्ये पदक मिळविले आहे किंवा टीम इव्हेंटमध्ये ६ वे स्थान मिळविले आहे – १० गुण, (५) खेलो इंडिया गेम्समध्ये राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्याने वैयक्तिक खेळामध्ये पदक मिळविले आहे किंवा टीम इव्हेंटमध्ये ६ वे स्थान मिळविले आहे. (६) राज्य स्तरावर/जिह्याचे प्रतिनिधित्व केलेला खेळाडू ज्याने वैयक्तिक खेळामध्ये पदक मिळविले आहे किंवा टीम इव्हेंटमध्ये ४ थे स्थान मिळविले आहे. (७) अखिल भारतीय शालेय फेडरेशन स्पर्धेमध्ये वैयक्तिक खेळामध्ये पदक मिळविले आहे किंवा टीम इव्हेंटमध्ये ६ वे स्थान मिळविले आहे असा खेळाडू – ५ गुण, (६) NCC ’ A’ सर्टिफिकेट – ५ गुण, (७) NCC B सर्टिफिकेट – १० गुण, (८) NCC ’ C’ सर्टिफिकेट – १५ गुण, (९) NCC ’ C’ सर्टिफिकेट आणि प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) संचालनात सहभाग – २० गुण. वरील कॅटेगरीतील उमेदवारांना जास्तीत जास्त २० बोनस गुण दिले जातील. (जरी ते एकापेक्षा अधिक प्रकारातील बोनस गुणांस पात्र असले तरी)

निवड पद्धती – फेज-१ – कॉमन एन्ट्रन्स एक्झाम (CEE) कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सेंटर्सवर घेतली जाईल. CEE मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ प्रकारचे ५० प्रश्न १ तासात किंवा १०० प्रश्न २ तासात सोडवायचे असतील. चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या २५ टक्के गुण वजा केले जातील.)

उमेदवारांना ५ परीक्षा केंद्रांसाठी पसंतीक्रम द्यावयाचा आहे. लेखी परीक्षा २२ एप्रिल २०२४ पासून सुरू होणार आहे.

परीक्षा शुल्क – रु. २५०/- ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत.

फेज-२ – लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवडलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी Join Indian Army वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. https:// joinindianarmy. nic. in या वेबपोर्टलवरून फेज २ साठीचे अॅडमिट कार्ड उमेदवारांना आपले लॉगइन प्रोफाईल वापरून डाऊनलोड करता येतील.

(१) शारीरिक क्षमता चाचणी भरती रॅलीच्या ठिकाणी – १.६ कि.मी. अंतर ५ मि. ४५ सेकंदांत धावणे, पुलअप्स (बीमवर), ९ फुटांचा खंदक ओलांडणे आणि झिगझॅग बॅलन्स. शारीरिक क्षमता चाचणी फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

(२) शारीरिक मापदंड तपासणी – भरती मेळाव्याच्या ठिकाणी होईल.

(३) वैद्याकीय तपासणी – भरती मेळाव्याच्या ठिकाणी वैद्याकिय तपासणीत नापास झाल्यास त्याविरुद्ध ५ दिवसांच्या आत मिलिटरी हॉस्पिटलकडे स्पेशालिस्ट रिह्यूसाठी पाठविले जाईल.

लेखी परीक्षेचा निकाल www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. उमेदवारांनी आपला निकाल पाहून आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसकडे कागदपत्र पडताळणीसाठी संपर्क साधावा. उमेदवारांना वेगळे सूचित केले जाणार नाही.

उर्वरित भाग पुढील अंकात