मुंबई : मुलुंडमधील ‘पूर्वरंग सोसायटी’चा पुनर्विकास खासगी विकासकाची मदत न घेता ५६ नोकरदार सभासदांनी स्वत:च करून नवा पायंडा घातला. २३ मजली नव्या इमारतीत एकूण ११८ सदनिका बांधल्यानंतर दलालांविना त्यांची यशस्वीरित्या विक्रीही केली असून हा फेरविकास कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता करण्यात आला.

‘म्हाडा’ने २०१४ मध्ये ‘पूर्वरंग सोसायटी’चे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण करून इमारत धोकादायक घोषित केले. पुनर्विकासातील शंका, अडचणींचा विचार केल्यानंतर विकासक न नेमता स्वबळावर इमारत उभारण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला. यासाठी १५ जणांची समिती स्थापन करण्यात आली. प्रकल्प सल्लागार नेमून कायदेशीर बाबी, आर्थिक जमा-खर्च, सरकारी नियम समजून घेण्यात आले. २०२०च्या अखेरीस इमारत पाडण्यात आली. करोना काळात आठ महिने काम ठप्प होऊनही रहिवाशांनी निराश न होता बांधकाम सुरू राहील यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. यासाठी एकूण ८७ कोटी रुपये खर्च आला. आजच्या बाजारभावानुसार बांधकाम खर्च २५० कोटी रुपये इतका आहे. यासाठी प्रख्यात वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू यांचे मार्गदर्शन घेण्यात आले.

Acharya college hijab ban
मुंबईतील चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयातील हिजाब बंदीविरोधात विद्यार्थिनींची उच्च न्यायालयात धाव
Mumbai police commits suicide marathi news
मुंबई: पोलिसाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
Mumbai ganeshotsav marathi news
मुंबई: गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात
sharad pawar latest marathi news
“नाटयगृहांवरील कर, देखभालीची जबाबदारी सरकारची”, शरद पवार यांचे मत
Maharashtra school uniform marathi news
शालेय विद्यार्थ्यांना लवकरच एकसमान गणवेश, शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण
Mumbai Police, 170 Fake Rs 500 Notes , Mumbai Police Arrests Man with 170 Fake Rs 500 Notes from govandi, govandi s Shivaji nagar , fake notes, Mumbai news
मुंबई : गोवंडीत बनावट नोटांसह एकाला अटक
Deputy bank Manager, Deputy bank Manager Arrested for Helping Accused in fraud, Rs 41 Lakh fraud, Deputy bank Manager Mumbai arrested, cyber fraud, Mumbai news, Withdraw Rs 41 Lakh from Customer's Account fraud,
खासगी बँकेतील अधिकाऱ्याला सायबर फसवणुकीप्रकरणी अटक
sharad pawar on theatres responsibility
नाटयगृहांवरील कर, देखभालीची जबाबदारी सरकारची ; शरद पवार यांचे मत
maha vikas aghadi misled people in lok sabha election chandrashekhar bawankule
अपप्रचाराला जनसंवादातून उत्तर; राज्य भाजपच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

आणखी वाचा-कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचे प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाची धावपळ

पुनर्विकासानंतर रहिवाशांना १०१५ चौरस फूटांहून अधिक (पूर्वीचे ३९५ चौरस फूट) अधिक क्षेत्रफळाचे घर मिळाले आहे. ९ एप्रिल रोजी सभासदांना घराच्या चाव्या मिळाल्या. अद्यायावत सोयी-सुविधांनी परिपूर्ण, सुटसुटीत व दर्जेदार घरे, उच्च प्रतीचे बांधकाम साहित्य, प्रशस्त जागा मिळाली आहे. इमारतीत ९५ टक्के मराठी भाषिक सभासद आहेत, असे सोसायटीचे सचिव मिलिंद महाडिक यांनी सांगितले.

खासगी विकासकाऐवजी इमारतीचा स्वयंपुनर्विकास अधिक सोयीस्कर आहे. मोठी आणि स्वस्त घरे, अधिक सोयी-सुविधा, स्वस्त घरे, प्रशस्त जागा, इमारतीचे आरेखन, उत्तम दर्जाचे बांधकाम अशा संकल्पनेतून शक्य आहे. सभासद आणि ग्राहकांना एकाच दर्जाची घरे देण्यात आली. मुंबईत सध्या ८९० सोसायट्यांनी स्वयंपुनर्विकासाचा ठराव मंजूर केला आहे. ४० सोसायट्यांचे विविध स्तरावर काम सुरू आहे. तसेच, २० सोसायट्यांचे काम पूर्ण झाले आहे. -चंद्रशेखर प्रभू, (ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ)