● महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागातील ‘पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ’ पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगांमार्फत केली जाईल.
एकूण रिक्त पदे – २,७९५ (अजा – ३७६, अज – १९६, विजा-अ – ७९, भज-ब – ६८, भज-क – ९३, भज-ड – ६३, इमाव – ५३५, विमाप्र – ५४, साशैमाव – २८०, आदुघ – २८२, खुला – ७६९) (आरक्षित पदे – महिला – ८३९; खेळाडू – १४०, अनाथ – २८)) (११२ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी (कॅटेगरी – D/ HH – ३८, OH/ DW – ३७; SLD/ MI – ३७ पदे) राखीव).
पात्रता – (दि. १९ मे २०२५ रोजी) वेटेरनरी सायन्स किंवा वेटेरिनरी सायन्स अँड अॅनिमल हजबंडरी विषयातील पदवी. (राज्य पशुवैद्याक परिषद/भारतीय पशुवैद्याक परिषद कायदा १९८४ नुसार नोंदणी असणे आवश्यक असून नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद करणे अनिवार्य आहे.)
वयोमर्यादा – (दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी) किमान – सर्व संवर्गांसाठी – १८ वर्षे; कमाल – खुला – ३८ वर्षे, मागासप्रवर्गीय/आदुघ/अनाथ/खेळाडू – ४३ वर्षे, दिव्यांग – ४५ वर्षे. (मा.सै. सैनिकी सेवेचा कालावधी ३ वर्षे)
वेतन श्रेणी – वेतन स्तर एस-२० (रु. ५६,१०० १,७७,५००) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. व्यवसायरोध भत्ता अनुज्ञेय नाही. तसेच खाजगी व्यवसाय करण्यास परवानगी नाही.
निवड प्रक्रिया – अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करणेसाठी पात्रता/अनुभव पाहून उमेदवार शॉर्टलिस्ट करून अथवा चाळणी परीक्षेद्वारे केली जाईल. मुलाखतीमध्ये किमान ४१ टक्के गुण मिळविणे आवश्यक.
चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम इ. आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रित करून तर चाळणी परीक्षा न घेतल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल.
अर्जाचे शुल्क – खुला – रु. ३९४/-; मागासवर्गीय/ आदुघ/अनाथ/दिव्यांग – रु. २९४/-.
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दि. १९ मे २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत ऑफलाइन पद्धतीने भारतीय स्टेट बँकेमध्ये चलानद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दि. २१ मे २०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दि. २२ मे २०२५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत.
विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड, विमाप्र, इमाव, साशैमाव उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱयाने जारी केलेले नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची पद्धत – https:// mpsc. gov. in या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील पॅरा १२ मध्ये उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज https:// mpsconline. gov. in या संकेतस्थळावर दि. १९ मे २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.
suhaspatil237@gmail.com