सुहास पाटील

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक किंवा तत्सम संवर्गातील तसेच कनिष्ठ लेखा परिक्षक व लेखा सहाय्यक पदावरील कर्मचाऱ्यांमधून अंतर्गत निवड पद्धतीने ‘अनुज्ञापन निरीक्षक ( Licence Inspector)’ पदांची भरती. (सूचना परिपत्रक क्र. अअ/२६८३/आस्था-१ दि. १५ मार्च २०२४) भरावयाच्या रिक्त पदांची संख्या – ११८ (अजा – १४, अज – १४, विजा-अ – ५, भज-ब – ४, भज-क – ५, भज-ड – २, विमाप्र – ३, इमाव – १८, आदुघ – १२, साशैमाप्र – १२, खुला – २९).

Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”
Maharashtra State Examination Council Pune jobs
MSCE Pune Recruitment 2024 : पुणे शहरात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! ‘या’ पदांवर होणार भरती
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”

महिलांसाठी ३० टक्के जागा आरक्षित एकूण – ३७ (अजा – ४, अज – ४, विजा-अ – २, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – १, विमाप्र – १, इमाव – ५, आदुघ – ४, साशैमाप्र – ४, खुला – ९) (दिव्यांगांकरिता ५ पदे आरक्षित (कॅटेगरी अल्पदृष्टी – २, ऐकू येण्यातील दुर्बलता – १, अस्थिव्यंगता – १, मानसिक आजार किंवा एमडी – १)).

विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड या प्रवर्गातील कर्मचारी उपलब्ध न झाल्यास सदर पदे आंतर-परिवर्तनीय म्हणून भरण्यात येतील.

महिलांकरिता आरक्षित पदांवरील निवडीसाठी दावा करणाऱया महिलांना नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र नियुक्तीवेळी सादर करणे अनिवार्य आहे. (अजा/ अज/ खुला प्रवर्गातील उमेदवारांना ही अट लागू नाही.)

पात्रता – पदवी परीक्षा उत्तीर्ण. १० वी किंवा उच्चतम परीक्षा १०० गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असावा. एमएस-सीआयटी किंवा जीईसीईटी किंवा तत्सम संगणक हाताळणी प्रमाणपत्रधारक असावा.

अनुभव – बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक व तत्सम तसेच कनिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहाय्यक व तत्सम पदावर दि. ३१ मार्च २०२३ रोजीपर्यंत किमान ५ वर्षे नियमित तत्त्वावरील सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – (दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी) खुला प्रवर्ग – ३८ वर्षे; मागासप्रवर्ग – ४३ वर्षे.

निवड पद्धती – बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱयांमधून अंतर्गत निवड पद्धतीने १०० गुणांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षा आयबीपीएस मार्फत घेतली जाईल.

(१) महानगरपालिका अधिनियमांतर्गत अनुज्ञापन देण्याची तरतूद (प्रकरण) कलम – (अ) जाहिरात – ३२८/३२८ A – ३५ प्रश्न, (ब) फेरीवाला – ३१३ A – २० प्रश्न, (क) व्यापार व उद्दिमे ३९४ – १० प्रश्न, (ड) अवकाने – ३१३ (१) bc – ५ प्रश्न.

(२) नागरी दैनंदिनी – १० प्रश्न, (३) सामान्य ज्ञान – १५ प्रश्न, (४) कायदा विषयक ज्ञान – ५ प्रश्न. एकूण १०० प्रश्न, १०० गुण. निवडीसाठी ऑनलाइन परीक्षेत किमान ४५ गुण प्राप्त करणे आवश्यक.

मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही. अंतिम निवड ऑनलाइन परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल.

परीक्षा शुल्क – ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहे. खुला प्रवर्ग – रु. १,०००/-; मागास प्रवर्ग – रु. ९००/-.

ऑनलाइन अर्ज portal. mcgm. gov. in या संकेतस्थळावरील उज्ज्वल संधीकरिता अंतर्गत सर्व नोकरीच्या संधी टॅबमधून दि. २० एप्रिल २०२४ ते दि. १७ मे २०२४ (रात्री १२.०० वाजे)पर्यंत करावेत.उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवावी.