UPSC 2024 Results : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल मंगळवारी (१६ एप्रिल) जाहीर झाला. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी अनेकजण हे घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करून पुढे आले आहेत. तर काही उमेदवार असे आहेत जे या परीक्षेत अनेकदा अपयशी झाले होते, मात्र त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा-पुन्हा प्रयत्न करून यश मिळवलं आहे. असाच एक उमेदवार कर्नाटकमध्ये आहे. पोलीस उपनिरीक्षक शांताप्पा के. उर्फ शांताप्पा जादमानवर हे यूपीएससीत तब्बल सात वेळा अपयशी ठरले. मात्र आठव्या प्रयत्नात त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.

शांताप्पा अवघ्या एका वर्षाचे असताना त्यांच्या डोक्यावरील पित्याचं छत्र हरपलं. त्यानंतर त्यांच्या आईने शांतप्पांचं पालनपोषण करण्यासाठी इतरांच्या शेतात मोलमजुरी केली. शांताप्पा पदवी परीक्षेत चार विषयांमध्ये नापास झाले होते. असा तरूण पुढे यूपीएससीसारख्या परीक्षेत उत्तीर्ण होईल असं कोणालाच वाटलं नसेल. मात्र शांताप्पा यांनी अविश्वसनीय अशी कामगिरी करत यूपीएससी परिक्षेत यश मिळवलं. सात वेळा पदरी अपयश आल्यावरही शांताप्पांनी हार मानली नाही, त्यांचं मनोबल खचलं नाही. यंदा त्यांनी आठव्यांदा प्रयत्न केला आणि परीक्षेत ६४४ व्या रँकसह ते उत्तीर्ण झाले. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण या कामगिरीवर आनंदी आहेत. शांताप्पा यांच्या या यशानंतर त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे इतर सहकारी मिठाई वाटू लागले आहेत.

UPSC Success Story Of Uday Krishna Reddy
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी
dhule srpf marathi news,
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
UPSC 2023 Topper Aditya Srivastava
अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

पोलीस उपिरीक्षक शांताप्पा बंगळुरू शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातील कमांड सेंटरमध्ये तैनात आहेत. शांताप्पांचा यूपीएससी रँक पाहता त्यांची आयपीएस किंवा आयआरएस अधिकारी म्हणून नेमणूक होऊ शकते. मात्र, शांताप्पा यांचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. बेल्लारी जिल्ह्यातील होसा जेनिकेहल गावातून आलेल्या या तरुणाचं बालपण हलाखीत गेलं. वडील गेल्यानंतर त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र आईने काबाडकष्ट करून त्यांना वाढवलं, शिकवलं आणि पोलीस उपनिरीक्षक केलं.

हे ही वाचा >> चंद्रपुरची कन्या शारदा मादे्शवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

शांताप्पा शाळेत फार हुशार नव्हते. एका बाजूला आई मोलमजुरी करून घराचा आर्थिक गाडा ओढत होती तेव्हा शांताप्पांची शाळा-महाविद्यालयात जेमतेम प्रगती चालू होती. पदवीपूर्व परीक्षेत तर ते नापास झाले. त्यानंतर पुढच्या प्रयत्नात ते ३९ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले. शांताप्पा म्हणाले, याच काळात माझ्या महाविद्यालयातील आणि गावातील मित्रांचं माझ्याबरोबरचं वागणं बदललं. त्यामुळे मला समजलं की शिक्षणाशिवाय या जगात आपल्याला काहीच किंमत मिळणार नाही. मग मी अभ्यासावर लक्ष दिलं. मी वीरशैव महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला.

यूपीएससीच्या तयारीसाठी शांताप्पा दिल्लीला गेले. तिथे त्यांनी एका कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला. परंतु, पुढचा मार्ग आणखी खडतर होता. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ सात वेळा ही परीक्षा दिली. प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी अपयश आलं. दरम्यान, सुरुवातीच्या काळात यूपीएससीत अपयश आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या बाजूला पोलीस होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तिथे मात्र त्यांना यशाची चव चाखायला मिळाली आणि २०१६ मध्ये ते पोलीस उपनिरीक्षक झाले. पोलीस झाल्यानंतरही त्यांनी त्यावर समाधान न मानता यूपीएससीचा अभ्यास चालूच ठेवला. त्यांची वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये बदली होत होती. पोलीस खात्यातही ते त्यांचं काम चोख करत होते आणि यूपीएससीची तयारी करत होते. अखेर सात वेळा अपयशाला सामोरे जाणाऱ्या शांताप्पा यांना यंदा यूपीएससीत यश मिळालं. ते देशात ६४४ व्या क्रमांकाने या परीक्षेत उत्तीर्ण झाले. शांताप्पा यांनी टाईम्स ऑफ इंडियाबरोबर त्यांची संघर्षकहाणी शेअर केली.

हे ही वाचा >> अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!

आपल्या देशातील तरुणांना काय सल्ला द्याल? असं विचारल्यावर शांताप्पा म्हणाले, मी आपल्या देशातील सर्व तरुणांना एवढंच सांगेन की शिक्षणामुळेच आपलं आयुष्य चांगलं होऊ शकतं. मला वाटतं, आपल्या देशातील तरुणांनी क्रिकेट किंवा राजकारणामागे आपला वेळ आणि आयुष्य वाया घालवू नये. त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं.