केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल मंगळवारी (१६ एप्रिल) जाहीर झाला. यामध्ये आदित्य श्रीवास्तव हा विद्यार्थी देशात पहिला आला आहे. आदित्य श्रीवास्तव हा मूळ लखनऊचा आहे. आदित्यने आयआयटी कानपूरमधून बीटेक आणि एमटेकचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर आदित्यने जवळपास १५ महिने कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले. मात्र, यानंतर यूपीएससी परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली आणि यशही मिळवले.

आदित्य श्रीवास्तवने मागील वर्षीही यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले होते. आदित्यने मागच्या वर्षी २२६ रँक मिळवत ‘आयपीएस’ची पोस्ट मिळवली होती. सध्या तो पश्चिम बंगालमध्ये आयपीएसचे प्रशिक्षण घेत आहे. मात्र, यानंतर पुन्हा तिसऱ्या प्रयत्नात आदित्यने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या संपूर्ण प्रवासाबद्दल एका मुलाखतीत बोलताना आदित्य श्रीवास्तवने या यशाचे रहस्य सांगितले आहे.

UPSC Success Story Of Uday Krishna Reddy
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल

हेही वाचा : UPSC CSE Final Result 2023 Out: यूपीएससीचे निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, तर अनिमेश प्रधान दुसऱ्या क्रमांकावर!

आपण एका संस्थेमध्ये तब्बल २.५ लाख मासिक वेतन मिळणारी नोकरी सोडून यूपीएससीची तयारी केल्याचे आदित्यने सांगितले. आदित्य श्रीवास्तव हा नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याआधी आणि आयआयटी कानपूरमधून बीटेक आणि एमटेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकन संस्था गोल्डमन सॅक्समध्ये नोकरी करत होता. या नोकरीमधून महिन्याला जवळपास अडीच लाख रुपयांचा पगार मिळायचा. मात्र, तरीही आदित्यचे मन काही या नोकरीत रमले नाही. त्यानंतर २०१७ साली नोकरीसोडून नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली.

यानंतर गेल्या वर्षी आदित्ये नागरी सेवा परीक्षेत २२६ रँक मिळवला. यामध्ये ‘आयपीएस’ची पोस्ट मिळाली. मात्र, तरीही न थांबता पुन्हा प्रयत्न केले आणि या वर्षी पुन्हा एकदा परीक्षा उत्तीर्ण करत देशात प्रथम क्रमांक मिळविला. एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी का सोडली? याबाबत त्याने एका मुलाखतीत सांगितले की, मी ज्या क्षेत्रातून आलो, त्या भागाचे ज्ञान मला होतेच. पण त्याबरोबरच नागरी सेवांबद्दल मला आवड होती. त्यामुळे शेवटी मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेत तयारी केली. मला असे जाणवले की आपल्या जीवनावर प्रभाव पाडण्यासाठी सामाजिक प्रतिष्ठेचाही एक घटक त्याच्याशी निगडीत आहे. प्रतिष्ठा हवी आहे का? या प्रश्नावर आदित्यने सांगितले की, गोल्डमन सॅक्समध्ये नोकरी केली असती तर कदाचित युनायटेड स्टेट्समध्येही जाऊन आलो असतो.