उत्पादन आधारित शेती व्यवसाय एक फायदेशीर आणि शाश्वत व्यवसाय आहे. योग्य नियोजन आणि कठोर परिश्रमाने या व्यवसायात चांगले यश मिळवता येते.
शेती व्यवसायात नियोजन आणि व्यवस्थापन चांगले असावे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड या व्यवसायाला असावी. हे सूत्र या व्यवसायाच्या यशाची गुरुकिल्ली आहे.
मातीतील करियर सर्वसमावेशक आहे. यातील उत्पादने आधारित कृषी व्यवसाय या लेखात आपण माहिती घेणार आहोत. कृषी संबंधित व्यवसाय सुरू करण्यापूर्वी जगभरात लोकप्रिय असलेल्या शेतीचे प्रकार समजून घेणे महत्त्वाचे आहे.
उत्पादन आधारित कृषी व्यवसाय प्रामुख्याने खालील प्रवर्गात मोडतात-
१. उद्यानविद्या उत्पादन आधारित व्यवसाय
२. कृषी विद्या उत्पादन आधारित व्यवसाय
३. दुग्धजन्य उत्पादन आधारित व्यवसाय
४. वनकी उत्पादन आधारित व्यवसाय
१.उद्यानविद्या शेतीची एक शाखा आहे. यामध्ये फुले, भाज्या, मसाले, सुशोभित झाडे, औषधी वनस्पती यांची लागवड व उत्पादन केले जाते.
कृषी व्यवसाय निवडताना प्रामुख्याने काही बाबी विचारात घेणे गरजेचे आहे.
१. जमिनीची निवड व हवामान
२. पाण्याची उपलब्धता व व्यवस्थापन
३. मशागत, खते आणि कीटकनाशक व्यवस्थापन
४. रोग व कीड नियंत्रण
५. काढणी, प्रतवारी व विक्री व्यवस्थापन
प्रत्येक शेती व्यवसाय हा तोट्यात जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे अपुरी माहिती. कारण अपुरी माहिती ही शेती व्यवसाय तोट्यात आणत आहे. हे पीक लावा व एका एकरात दहा लाख रुपये मिळवा अशा काही जाहिराती तसेच सोशल मीडियावरील बातम्या याद्वारे युवक पिकांची निवड करतात व पीक वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर नुकसानीस कारणीभूत होतात. म्हणून युवकांनी उद्योगिक क्षेत्राप्रमाणे शेती क्षेत्राकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे. त्यातील फायदे – तोटे याचा अभ्यास करावा.
स्वातंत्र्यपूर्व ७०% शेतीवर अवलंबून असणारा आपला भारत देश आज ६०%टक्केपेक्षा कमी लोकसंख्या शेती व शेती निगडित व्यवसायावर अवलंबून आहे. म्हणजे भविष्यात ज्याकडे शेती आहे त्याला सोन्याचे दिवस येतील अशी सर्व कृषी तज्ज्ञांची मानसिकता आहे.
उदाहरण म्हणून बटाटा पिकांची माहिती घेऊ. एक एकर शेतीमध्ये आठ टन बटाटा आपण उत्पादित करू शकतो. त्याचा सर्व खर्च ७० ते ८० हजार रुपये आहे. सरासरी याचा दर १७ रुपये गृहीत धरला तर (कंपनीसोबत सामंजस्य करार केल्यामुळे) एक लाख छत्तीस हजार रुपये मिळू शकतात. परंतु खर्च वजा जाता ५५ ते ६५ हजार रुपये शिल्लक राहतात. अभ्यासाचा भाग हा आहे की, या पिकांचे आयुष्यमान नव्वद दिवसांचे आहे. म्हणजे अर्थशास्त्राच्या भाषेत एक रुपया गुंतवल्यावर एक रुपया आपणास तीन महिन्यांत परतावा मिळू शकतो. परंतु शेतीमध्ये आपण हवामान व रिस्क मॅनेजमेंट या बाबीसंदर्भात अभ्यास करून निर्णय घेणे गरजेचे आहे.
२. कृषी उत्पादन आधारित व्यवसायामध्ये सर्व खाद्य व नगदी पिके यांचा समावेश होतो.
३. दुग्धजन्य उत्पादन आधारित व्यवसायामध्ये दुग्ध व इतर उपपदार्थ करणे यांचा समावेश होतो. (या व्यवसायासंदर्भात आपण विस्तृत माहिती वेगळ्या लेखांमध्ये देणार आहोत)
४. वनकी व्यवसायामध्ये जंगली झाडांचे उत्पादन तसेच लाकूड व इतर व्यवसायासाठी लागणारी झाडे यांचा समावेश होतो.
कृषी उत्पादन व्यवसाय पारंपरिक पद्धतीने शेतकरी वर्षानुवर्षे करत आहे. परंतु कृषी पदवीधर युवकांना व शेतीमध्ये करिअर करू इच्छित युवकांना फक्त यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन आणणे महत्त्वाचे आहे. नियोजन आणि व्यवस्थापन चांगले असावे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. नवीन घडामोडींवर लक्ष ठेवावे.
कृषी व्यवसाय करताना घ्यावयाची काळजी
१. हवामान (नैसर्गिक आपत्ती)
२. बाजारातील चढ-उतार
३. व्यवस्थापनातील त्रुटी
शेती उत्पादन कृषी व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्याचा वापर औद्योगिक दृष्टिकोनातून शेती व्यवसाय अधिक फायदेशीर बनवण्यासाठी शास्त्रीय आणि व्यावसायिक दृष्टिकोन वापरणे गरजेचे आहे.
तरुण युवकांनी शेती व्यवस्थापनामध्ये करिअर करावे व शाश्वत शेती विकसित करावी हा प्रामुख्याने उत्पादन आधारित क्षेत्राचा उद्देश आहे. शेती उत्पादन प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या येणाऱ्या अडचणींमुळे याकडे युवकांचा पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होत आहे. परंतु शेती उत्पादन कृषी व्यवसायामध्ये कृषी तंज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे यांनी तयार केलेल्या गुड अग्रीकल्चर प्रॅक्टिसेस याचा वापर करून शाश्वत शेती तसेच विकसित भारत २०४७ मध्ये जी शेतीसाठी उद्दिष्टे ठेवलेली आहेत ती आपण गाठू शकतो.