Mahavitaran vidyut sahayak Bharti : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) अंतर्गत ५३४७ रिक्त जागांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. विद्युत सहाय्यक या पदासाठी हे अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज कसा करावा, अर्ज करण्याची पद्धत, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

पदसंख्या – विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण ५३४७ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता – विद्युत सहाय्यक पदासाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता ठरविण्यात येईल.
अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
आणि
ब) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (ईलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

हेही वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार

वयोमर्यादा – विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज करताना पात्र उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे असावीत.

परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५० + GST रुपये तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी १२५ + GST रुपये आहेत.

अर्ज पद्धती – या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मे २०२४ या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाईट – या भरती प्रकियेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर या https://www.mahadiscom.in/ अधिकृत वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करावे.

अधिसुचना – अर्ज करण्यापूर्वी https://www.mahadiscom.in/wp-content/uploads/2023/12/MSEDCL-ADVT.NO_.-06_2023_VIDYUT-SAHAYYAK_29.12.2023.pdf ही अधिसुचना वाचावी.

वेतन

प्रथम वर्ष- एकूण मानधन १५,०००/- रुपये
द्वितीय वर्ष – एकूण मानधन १६,०००/- रुपये
तृतीय वर्ष- एकूण मानधन १७,०००/- रुपये

अर्ज कसा करावा?

या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.
अर्ज करताना आवश्यक माहिती भरावी आणि आवश्यक कागदपत्रे जोडावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२४ पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.