● महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank) (दी विदर्भ को-ऑप. बँक लिमिटेड अंतर्भूत) (शेड्यूल्ड बँक), मुंबई ट्रेनी ऑफिसर्स (ज्युनियर ऑफिसर ग्रेड) आणि ट्रेनी असोसिएट पदांची भरती.

एकूण रिक्त पदे – ७५.

(१) ट्रेनी असोसिएट्स – एकूण ५० पदे.

पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. (उमेदवाराने १० वीची परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.)

टायपिंगचे शासकीय कमर्शियल प्रमाणपत्र मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

वयोमर्यादा – (१ जून २०२५रोजी) २१ ते २८ वर्षे.

स्टायपेंड – १२ महिन्यांच्या ट्रेनिंग दरम्यान दरमहा रु. २५,०००/- स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर ट्रेनींना ‘असोसिएट’ पदावर (वेतन दरमहा रु. ३४,०००/-) बँकेत कायम केले जाईल. १२ महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी असेल.

(२) ट्रेनी ज्युनियर ऑफिसर – एकूण ४४ पदे.

पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) किमान ५० गुणांसह उत्तीर्ण. उमेदवाराने १० वीची परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.

विधी पदवी/पदव्युत्तर पदवीधारक किंवा JAIIB/ CAIIB/ MS- CIT सर्टिफिकेशन किंवा ट्रेझरी/इंटरनॅशनल बँकिंग डिव्हीजनमधील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

अनुभव – बँकिंग क्षेत्रातील २ वर्षांचा ऑफिसर पदावरील अनुभव. (प्राधान्याने अर्बन/डीसीसी बँकेमधील ऑफिसर पदावरील अनुभव.)

वयोमर्यादा – (१ जून २०२५ रोजी) २३ ते ३२ वर्षे.

स्टायपेंड – दरमहा रु. ३०,०००/- स्टायपेंड दिले जाईल. १२ महिन्यांचा ट्रेनिंग कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर ट्रेनीना ज्युनियर ऑफिसर पदावर (वेतन दरमहा रु. ५२,०००/-) नियमित नेमणूक दिली जाईल. तत्पूर्वी ट्रेनीजना ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.

(३) ट्रेनी टायपिस्ट (असोसिएट ग्रेड) – एकूण ९ पदे.

पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) किमान ५० गुणांसह उत्तीर्ण. (१० वीची परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. वेगाचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र. उमेदवाराकडे कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रेड शिट) मधील प्रावीण्य असावे.

मराठी/इंग्रजी स्टेनोग्राफी शिकलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

अनुभव – अनुभव आवश्यक नाही. परंतु डीटीपी ऑपरेटर कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. १२ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधी (दरमहा रु. २५,०००/- स्टायपेंड) नंतर उमेदवारांना ६ महिने प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल. त्यानंतरच ट्रेनीजना बँकेत कायम केले जाईल.

वयोमर्यादा – २१-२८ वर्षे.

वेतन – ३४,०००/- दरमहा शिवाय दरमहा रु. ६५०/- टायपिस्ट भत्ता दिला जाईल.

(४) ट्रेनी ड्रायव्हर्स – एकूण ६ पदे.

पात्रता – १० वी उत्तीर्ण (मराठी एक विषय १० वीला असावा) आणि हलके मोटर वाहन चालविण्याचा परवाना.

अनुभव – आवश्यक नाही.

स्टायपेंड – ट्रेनिंग दरम्यान दरमहा रु. २२,०००/- स्टायपेंड दिले जाईल. १२ महिन्यांचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.

वेतन – दरमहा रु. २७,०००/-

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

अर्ज करण्याच्या दिवशी उमेदवार पदवी धारण करणारा असेल किंवा बँकेत रुजू झाल्यावर पदवी प्राप्त केल्यास १० वर्षांच्या सेवेनंतर त्यांना प्रमोशन मिळविता येईल.

(५) ट्रेनी प्यून – एकूण ५८ पदे.

पात्रता – १० वी (मराठी विषयासह) उत्तीर्ण.

इलेक्ट्रिशियन/प्लंबिंग कोर्स केला असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

१२ महिन्यांच्या ट्रेनिंग दरम्यान दरमहा रु. २०,०००/- स्टायपेंड दिले जाईल. त्यानंतर ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर ट्रेनीजना बँकेत रु. २४,५००/- दरमहा वेतनावर कायम केले जाईल. त्यांना ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

निवड पद्धती – ट्रेनी असोसिएट पदांसाठी – IBPS मार्फत ऑनलाइन परीक्षा आणि बँकेमार्फत इंटरव्ह्यू

ऑनलाइन परीक्षा १६० प्रश्न, २०० गुण, वेळ २ तास. ( i) रिझनिंग अॅबिलिटी अँड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड – ४० प्रश्न, ८० गुण; ( ii) इंग्लिश – ४० प्रश्न, ४० गुण; ( iii) रिझनिंग अॅबिलिटी अँड कॉम्प्युटर अॅबिलिटी – ४० प्रश्न, ४० गुण; ( iv) क्वांटिटेटिव्ह अँड न्यूमरिकल अॅबिलिटी – ४० प्रश्न, ४० गुण.

ट्रेनी प्यून आणि ट्रेनी ड्रायव्हर पदांसाठी – ऑनलाइन लेखी परीक्षा

ट्रेनी ज्युनियर ऑफिसर पदासाठी – ऑनलाइन परीक्षा आणि इंटरव्ह्यू.

अर्जाचे शुल्क – फक्त ऑनलाइन मोडने भरावयाचे आहे. ट्रेनी ज्युनियर ऑफिसर पदासाठी रु. १,७७०/-(जीएसटीसह); इतर पदांसाठी रु. १,१८०/-.

उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतात.

शंकासमाधानासाठी ई-मेल करा hrdm@mscbank.org.in

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन अर्जाचे रजिस्ट्रेशन https://www.mscbank.com/career.aspx या संकेतस्थळावर ६ ऑगस्ट २०२५ पर्यंत करावे. suhaspatil237@gmail.com