न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) (भारत सरकारचा उपक्रम), मुंबई. ५५० ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स (प्रशासकीय अधिकारी) (जनरालिस्ट्स अँड स्पेशालिस्ट्स) (स्केल-I) पदांची भरती. रिक्त पदांचा तपशील – (एकूण पदांपैकी १५टक्के पदे अजा, ७.५टक्के पदे अज, २७टक्के पदे इमाव, १०टक्के पदे ईडब्ल्यूएस्साठी राखीव) (१) ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (जनरालिस्ट) – १९३ पदे (८ पदे अपंग (कॅटेगरी HI, VI, OC, ID/MD साठी प्रत्येकी २ पदे राखीव.)
पात्रता – कोणत्याही विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
(२) AO (अकाऊंट्स) स्पेशालिस्ट – २५ पदे (१ पद अपंग कॅटेगरी OC साठी राखीव).
पात्रता – चार्टर्ड अकाऊंटंट (ICAI)/कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटंट आणि पदवी/पदव्युत्तर पदवी (कोणत्याही विषयातील) ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा MBA (फिनान्स)/PGDM (फिनान्स)/एम.कॉम. उत्तीर्ण.
(३) AO रिस्क इंजिनीअर्स – ५० पदे (प्रत्येकी १ पद अपंग कॅटेगरी HI, VI साठी राखीव).
पात्रता – इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (कोणत्याही शाखेतील).
(४) AO ऑटोमोबाईल इंजिनीअर्स – ७५ पदे (प्रत्येकी १ पद अपंग कॅटेगरी VI, OC, ID/MD साठी राखीव).
पात्रता – ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी आणि किमान १ वर्ष कालावधीचा ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा.
(५) AO लिगल स्पेशालिस्ट – ५० पदे (प्रत्येकी १ पद अपंग कॅटेगरी HI, VI, ID/MD साठी राखीव).
पात्रता – कायदा विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
(६) AO हेल्थ – ५० पदे (प्रत्येकी १ पद अपंग कॅटेगरी HI, OC साठी राखीव).
पात्रता – एम.बी.बी.एस./एम.डी./एम.एस. किंवा बी.डी.एस./एम.डी.एस. किंवा बी.ए.एम.एस./बी.एच.एम.एस.
(७) AO आयटी स्पेशालिस्ट – २५ पदे (१ पद अपंग कॅटेगरी HI साठी राखीव).
पात्रता – आयटी/कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा एमसीए.
(८) AO बिझनेस ॲनालिस्ट – ७५ पदे (प्रत्येकी १ पद अपंग कॅटेगरी HI, VI, ID/MD साठी राखीव).
पात्रता – स्टॅटिस्टिक्स/मॅथेमॅटिक्स/ॲक्च्युरियल सायन्स/डेटा सायन्स/बिझनेस ॲनालिस्ट विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
(९) AO कंपनी सेक्रेटरी – २ पदे.
पात्रता – ICSI कडील ACS/FCS आणि पदवी किंवा पदव्युत्तर पदवी कोणत्याही विषयातील.
(१०) AO ॲक्च्युरियल स्पेशालिस्ट – ५ पदे.
पात्रता – पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (कोणत्याही विषयातील आणि IAI किंवा IFoA चे किमान ४ ॲक्च्युरियल पेपर्स उत्तीर्ण. (CM१ पेपरसह आणि CB३ पेपरशिवाय ) आणि उमेदवार IFoA किंवा IAI चा ॲक्टिव्ह मेंबर असावा.)
सर्व पदांसाठी पात्रता परीक्षा (१ ऑगस्ट २०२५ रोजी) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. (अजा/अज/ अपंग – ५५टक्के)
वयोमर्यादा – (१ ऑगस्ट २०२५ रोजी) २१ ते ३० वर्षे. (उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९५ ते १ ऑगस्ट २००४ दरम्यानचा असावा.) (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, अपंग – १० वर्षे)
वेतन – अंदाजे दरमहा वेतन रु. ९०,०००/- आणि इतर सुविधा PFRDA यांच्या नॅशनल पेंशन सिस्टीम, ग्रॅज्युइटी, LTS इ.
निवड पद्धती – फेज-१ – प्रीलिमिनरी ऑनलाइन एक्झामिनेशन – (अंदाजे १४ सप्टेंबर २०२५ रोजी) ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० गुणांसाठी (इंग्लिश लँग्वेज – ३० गुण, रिझनिंग अॅबिलिटी – ३५ गुण, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड – ३५ प्रश्न, प्रत्येकी वेळ २० मिनिटे, एकूण वेळ १ तास.)
फेज-२ मेन एक्झामिनेशन – (अंदाजे २९ ऑक्टोबर २०२५ रोजी) ऑब्जेक्टिव्ह टेस्ट २०० गुणांसाठी आणि डिस्क्रीप्टिव्ह टेस्ट ३० गुणांसाठी. दोन्ही टेस्ट ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील.
ऑब्जेक्टिव्ह टेस्ट – २०० गुण, वेळ २ तास ३० मिनिटे. (ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (जनरालिस्ट) पदांसाठी) (रिझनिंग – ५० गुण, वेळ ४० मिनिटे; इंग्लिश लँग्वेज – ५० गुण, वेळ ४० मिनिटे; जनरल अवेअरनेस – ५० गुण, वेळ ३० मिनिटे; क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड – ५० गुण, वेळ ४० मिनिटे)
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्पेशालिस्ट पदांसाठी (रिझनिंग ४० गुण, वेळ ३० मिनिटे, इंग्लिश लँग्वेज – ४० गुण, ३० मिनिटे, जनरल अवेअरनेस – ४० गुण, २५ मिनिटे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड – ४० गुण, ३० मिनिटे, नॉलेज ऑफ स्पेशालिस्ट स्ट्रीम – ४० गुण, ३५ मिनिटे)
डिस्क्रीप्टिव्ह टेस्टचा कालावधी ३० मिनिटे. गुण – ३०. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज. (पत्र लेखन – १० गुण, निबंध लेखन – २० गुण)
ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपरमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.
फेज-३ इंटरव्ह्यू – मुख्य परीक्षेतून उमेदवार इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट केले जातील.
अंतिम निवड – मुख्य परीक्षा लेखी ऑब्जेक्टिव्हसाठी ७५ गुणांचे वेटेज आणि इंटरव्ह्यूसाठी २५ गुणांचे वेटेज देवून एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
अर्जाचे शुल्क – अजा/अज/अपंग रु. १००/- इतर उमेदवारांना रु. ८५०/-.
उमेदवार फक्त एका डिसिप्लिनसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज नोंदणी http://newindia.co.in या संकेतस्थळावर ३० ऑगस्ट २०२५पर्यंत करावी.