SECR Recruitment 2024: सध्या रायपूर विभागातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि वॅगन दुरुस्ती शॉपमध्ये मोठ्या संख्येने शिकाऊ उमेदवारांना [apprenticeship] भरती करण्यात येणार आहे. त्यात नेमक्या कोणत्या रिक्त पदांवर नोकरी उपलब्ध आहे ते पाहा. तसेच नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची अंतिम तारीख या सर्व गोष्टींबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

SECR Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

रायपूर विभागातील DRM कार्यालयातील पदसंख्या

BMC jobs opening news in marathi
BMC Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी मोठी भरती! पदासंबंधीची माहिती पाहा
RITES Recruitment 2024:
RITES Recruitment: परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधून होणार निवड; केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी
Nuclear Power Corporation of India inviting applications for 400 Executive Trainees post in Mumbai Details Here
NPCIL Mumbai Bharti 2024 : सरकारी नोकरीची संधी! ४०० जागा, ५५ हजारांपर्यंत पगार; ‘ही’ आहे अर्जाची शेवटची तारीख
AAI JE 2024 registration begins for 490 Junior Executive
AAI JE 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये ४९० पदांसाठी होणार भरती, १ मेपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

वेल्डर – १६१
टर्नर – ५४
फिटर- २०७
इलेक्ट्रिशियन- २१२
टंकलेखक [इंग्रजी भाषा]- १५
टंकलेखक [हिंदी भाषा] -८
कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्राम सहायक – १-
आरोग्य आणि स्वच्छता निरीक्षक-२५
मशिनिस्ट -१५
मेकॅनिक डिझेल – ८१
मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर – २१
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स -३५

एकूण – ८४४

हेही वाचा : IIIT Nagpur Recruitment 2024 : नागपूरच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदावर होणार भरती

SECR Recruitment 2024 – अधिसूचना –
file:///C:/Users/Online/Downloads/1712059326346-A%20A%20notification%202024-25.pdf

वॅगन दुरुस्ती शॉप, रायपूर पदसंख्या

फिटर-११०
वेल्डर – ११०
मशिनिस्ट – १५
टर्नर -१४
इलेक्ट्रिशियन-१४
कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्राम सहायक – ४
टंकलेखक [इंग्रजी भाषा]- १
टंकलेखक [हिंदी भाषा] -१

एकूण – २६९

SECR Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

वरील कोणत्याही पदावर अर्ज करण्यास इच्छुक असलेला उमेदवार १०+२ शिक्षण पद्धतीत किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून वरील नमूद केलेल्या कोणत्याही ट्रेडमधील आयटीआय कोर्स उत्तीर्ण असल्याचे सर्टिफिकेट असावे.

हेही वाचा : BMC Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी मोठी भरती! पदासंबंधीची माहिती पाहा

SECR Recruitment 2024 : अर्ज प्रक्रिया

वरील नमूद केलेल्या कोणत्याही पदासाठी उमेदवारास अर्ज करावयाचा असल्यास त्याने ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
अर्ज भरण्याआधी उमेदवाराने नोकरीसंबंधीची अधिसूचना व्यवस्थित वाचावी.
उमेदवाराने अर्ज भरताना त्यासह स्वतःची सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने अर्ज अंतिम तारखेआधी भरणे आवश्यक आहे.
अर्जाची अंतिम तारीख १ मे २०२४ अशी आहे.

पूर्व मध्य रेल्वे आणि वॅगन दुरुस्ती शॉपमध्ये होणाऱ्या भरतीबद्दल उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास, नोकरीची अधिसूचना वाचावी. संबंधित अधिसूचना वर देण्यात आली आहे.