Premium

TIFR मुंबई येथे नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, पदानुसार महिना २२ हजारांपर्यंत पगार मिळणार

मुलाखतीची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

TIFR Mumbai Bharti 2023
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TIFR Mumbai Bharti 2023: टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत लिपिक प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आले आहे. मुलाखतीची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती २०२३

पदाचे नाव – लिपिक प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी

एकूण पदसंख्या – १४

शैक्षणिक पात्रता –

  • लिपिक प्रशिक्षणार्थी – मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर.
  • प्रशिक्षणार्थी – ITI

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – २८ वर्षे.

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

हेही वाचा- इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या ४८४ जागांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

मुलाखतीचा पत्ता – टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १ होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४०० ००५

मुलाखतीची तारीख – १६ आणि २१ ऑक्टोबर २००२३ (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट – http://www.tifr.res.in

महिना पगार –

  • लिपिक प्रशिक्षणार्थी – २२ हजार रुपये.
  • प्रशिक्षणार्थी – १८ हजार ५०० रुपये.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

  • (https://drive.google.com/file/d/1c9_0co7zyelGO4zKjf2E4cOO1qmMdOAK/view)
  • (https://drive.google.com/file/d/1LM43q_CzrZbyjt6shCRPQi8q3PL7sY57/view)

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tifr bharati job opportunity at tata institute of fundamental research mumbai start recruitment see details jap

First published on: 28-09-2023 at 09:59 IST
Next Story
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या ४८४ जागांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या