● टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), कुलाबा, मुंबई (डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी, भारत सरकार यांची एक स्वायत्त संस्था आणि डीम्ड युनिव्हर्सिटी) एकूण २३ रिक्त पदांची भरती.
(१) प्रोजेक्ट लॅबोरेटरी असिस्टंट (बी) (फिटर ट्रेड) – २ (खुला).
पात्रता – फिटर ट्रेडमधील नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट ( NTC) किंवा नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट ( NAC).(२) सिक्युरिटी गार्ड – ३ (अज – १, खुला – २).
पात्रता – ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) डिफेन्स/ CAPF/नावाजलेल्या संस्थेमधील कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव, ( iii) फायर फायटिंग ट्रेनिंग सर्टिफिकेट/ NCC सर्टिफिकेट/ सिव्हील डिफेन्स ट्रेनिंग/होमगार्ड (डिफेन्स/ CAPF मधील उमेदवारांना ही अट लागू नाही), ( iv) संगणक चालविण्याचे ज्ञान.
(३) वर्क असिस्टंट – १ (खुला).
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि किमान १ वर्षाचा अनुभव. (४) वर्क असिस्टंट (टेक्निकल) (मेसॉन) – १ (खुला).
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि २ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.
(५) वर्क असिस्टंट (टेक्निकल) (फिटर) – १ (ईडब्ल्यूएस). (६) वर्क असिस्टंट (टेक्निकल) (पेंटर) – १ (खुला).
(७) लॅबोरेटरी असिस्टंट (बी) – १ (ईडब्ल्यूएस).
(८) लॅबोरेटरी असिस्टंट (बी) – १.
प्ात्रता – १२ वी ६० टक्के गुण आणि रिसर्च किंवा शैक्षणिक संस्थेमधील लॅबोरेटरी कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(९) लॅबोरेटरी असिस्टंट (बी) – १ (खुला).
पात्रता – १२ वी ६० टक्के गुण आणि बायोलॉजी/केमिस्ट्री लॅबोरेटरीमधील कामाचा २ वर्षांचा अनुभव.
(१०) लॅबोरेटरी असिस्टंट (बी) – १ (खुला).
पात्रता – एअर कंडिशनिंग ट्रेडमधील नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट ६० टक्के गुण आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव किंवा एअर कंडिशनिंग ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट आणि संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव.
(११) क्लर्क (ए) – ३ (इमाव – २, ईडब्ल्यूएस – १).
पात्रता – ( i) पदवी ५० टक्के गुण, ( ii) टायपिंगचे ज्ञान, ( iii) शासनमान्य संस्थेकडील संगणक अॅप्लिकेशन्सचे सर्टिफिकेट, ( iv) संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.
(१२) क्लर्क (ए) – १ (खुला).
पात्रता – पद क्र. ११ प्रमाणे. (१३) क्लर्क (ए) – १ (खुला).
पात्रता – पद क्र. ११ प्रमाणे. (१४) क्लर्क (ए) – १ (खुला).
पात्रता – पद क्र. ११ प्रमाणे.
(१५) अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट (बी) – १ (खुला).
पात्रता – ( i) पदवी ५५ टक्के गुण, ( ii) वर्ड प्रोसेसिंग/डेटा बेस/अकाऊंटींग प्रोसिजर्स कामातील प्रावीण्य, ( iii) अकाऊंट्स/पर्चेस/स्टोअर्स/ जनरल अॅडमिन/इस्टॅब्लिशमेंट कामाचा मोठ्या नावाजलेल्या संस्थेमधील ५ वर्षांचा अनुभव. (१६) सायंटिफिक ऑफिसर (बी) – १ (खुला).
पात्रता – लाईफ सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, झूऑलॉजी, फिशरिज सायन्समधील मास्टर्स डिग्री ६० टक्के गुण आणि १ वर्षाचा अॅनिमल लॅबोरेटरीमधील कामाचा अनुभव. (१७) असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर (ए) – १ (खुला).
पात्रता – पदवी ५५ टक्के गुण आणि NCC ( C) सर्टिफिकेट किंवा अॅडव्हान्स्ड सिव्हील डिफेन्स कोर्स सर्टिफिकेट.
(१८) प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर (सी) – १ (खुला). पात्रता – मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी ६० गुण आणि ३ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव. वयोमर्यादा – ( १ जुलै २०२५ रोजी) पद क्र. १ ते १४, १६ व १८ – २८ वर्षेपर्यंत; पद क्र. १५ – ३३ वर्षेपर्यंत; पद क्र. १७ – ३५ वर्षेपर्यंत.
ऑनलाइन अर्ज http://www.tifr.res.in या संकेतस्थळावर ९ ऑगस्ट २०२५ पर्यंत करावेत.
suhaspatil237@gmail.com