श्रीराम गीत

सर, मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. च्या प्रथम वर्षात आहे, मी बारावी विज्ञान ६९ टक्क्यांनी उत्तीर्ण झालो आहे. मी बी.ए करत आहे. मला एमपीएससी राज्यसेवा परीक्षा द्यायची आहे, तर तयारी संदर्भात मला मार्गदर्शन करावे. – प्रसाद

बीए उत्तम मार्काने पास होणे हे एकमेव ध्येय ठेव. बीए चे विषय कोणते त्याकरता निदान राज्य स्पर्धा परीक्षा देणाऱ्या कोणाचा तरी समक्ष भेटून सल्ला घे. त्याने घेतलेले विषय, परीक्षेचे स्वरूप व किती वर्षे परीक्षा देत आहे हे पण समजून घे. तोपर्यंत करिअर वृत्तांतचे वाचन व लोकसत्ता रोज संपूर्ण वाचणे एवढेच पुरे.

हेही वाचा >>> VIDEO : यूपीएससी-एमपीएससी २०२५ परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…

मी यूपीएससीची तयारी करत आहे. सोबतच सांस्कृतिक गोष्टींचा मला छंद असल्यामुळे अभिनय, वक्तृत्व, वादविवाद यात भाग घेतो. माझ्याकडे दोन एनजीओ आहेत, त्याच्या माध्यमातून आम्ही सामाजिक सेवा देखील करत असतो. स्पर्धा परीक्षांकडे बघितल्यानंतर त्यामधील जी स्पर्धा आहे त्यामुळे कदाचित भविष्यामध्ये अपयश आलेच, तर माझ्या कलेच्या जोरावर मी कुठल्या क्षेत्राशी निगडित काम केले पाहिजे? त्यासाठी संतुलन कशा पद्धतीने राखता येईल?

– स्वप्निल खरात पाटील, संभाजीनगर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वप्निल, तू तुझे वय, तुझे शिक्षण, तुझे मार्क व सध्या करत असलेल्या कामाचे स्वरूप याबद्दल काहीही न लिहिता मला काय आवडते व माझ्याकडे दोन एनजीओ आहेत असे त्रोटक लिहिले आहेस. यूपीएससीची तयारी किती वर्ष व कोणत्या पद्धतीत करत आहेस तेही लिहिलेले नाहीस. त्यामुळे तुला मोघम उत्तर देत आहे. एमएसडब्ल्यू पूर्ण कर. एनजीओ बरोबरचे काम चालू ठेव. त्या दरम्यान यूपीएससीची तयारी करत रहा.