नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, या लेखात आपण यूपीएससी मुख्यपरीक्षेतील ‘जीएस ३’ या पेपरमधील ‘आपत्ती व्यवस्थापन’ हा घटक आपण समजून घेणार आहोत. भारत हा भौगोलिकता आणि लोकसंख्येच्या दृष्टीने विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना अत्यंत संवेदनशील आहे. भारत विशेषतः हिमालयीन प्रदेश आणि ईशान्य भागात भूकंपांना बळी पडतो तसेच हिमालय आणि पश्चिम घाटात भूस्खलन देखील सामान्य आहे. पूरजन्य परिस्थिती नियमितपणे आपण अनुभवतो. भारतातील प्रमुख शहरांपैकी हैदराबाद हे शहर जोरदार मान्सून पर्जन्यवृष्टी, बदलणारे हवामान, शहरी नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे वारंवार पुराचा अनुभव घेते.

आयोगाने यासाठी दिलेला अभ्यासक्रम :

आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती जोखीम लवचिकपणा, आपत्तीसंबंधी समाजाची लवचिकता.

२०२४ च्या मुख्यपरीक्षेत यावर ३० गुणांचे प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नांच्या उत्तरात नेमके काय अपेक्षित आहे ते बघूया –

२०२४ च्या मुख्य परीक्षेत याच्याशी संबंधित पुढील प्रश्न बघा –

प्र. आपत्ती निवारण म्हणजे काय? ते कसे ठरवले जाते? निवारण चौकटीच्या विविध घटकांचे वर्णन करा.

आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी सेंडाई फ्रेमवर्क (२०१५-२०३०) चे जागतिक लक्ष्य देखील सांगा. (२५० शब्दांत उत्तर लिहा – १५ गुण)

ह्योगो फ्रेमवर्क फॉर अॅक्शन (संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण, २००५) नुसार, आपत्ती निवारण म्हणजे, ‘संभाव्यतः धोक्यांशी जुळवून घेण्याची प्रणाली होय. आपत्ती निवारण ही आजच्या जगात एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे, ज्यात व्यक्ती, समुदाय आणि समाजाची आपत्तींसाठी प्रभावीपणे तयारी करणे, प्रतिसाद देणे आणि त्यातून सावरणे, त्यांचे परिणाम कमी करणे आणि संभाव्यतः आपत्तीपूर्व स्थितीत सुधारणा करणे इत्यादी क्षमतांचा समावेश होतो. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्रियपणे असुरक्षितता कमी करणे आणि क्षमता निर्माण करणे याबद्दल आहे.

आपत्ती निवारण आराखड्याचे मुख्य घटक:

धोका मूल्यांकन: समुदायातील संभाव्य धोके, असुरक्षितता आणि क्षमता ओळखणे.

पायाभूत सुविधांची लवचिकता: चक्रीवादळ-प्रतिरोधक निवारागृहे यांसारख्या आपत्तींना तोंड देण्यासाठी पायाभूत सुविधांचे डिझाइन आणि बांधकाम करणे.

संस्थात्मक समन्वय: सरकारी संस्था, अशासकीय संस्था आणि इतर भागधारकांसाठी स्पष्ट भूमिका आणि जबाबदाऱ्या निश्चित करणे.

आर्थिक यंत्रणा: विमा आणि आपत्ती निवारण निधीसह तयारी, प्रतिसाद आणि पुनर्प्राप्तीसाठी निधीची उपलब्धता सुनिश्चित करणे.

सामाजिक लवचिकता: जागरूकता कार्यक्रम, शिक्षण आणि उपजीविका समर्थनाद्वारे समुदाय क्षमता निर्माण करणे.

आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी सेंडाई फ्रेमवर्कचे जागतिक लक्ष्य:

२०३० पर्यंत जागतिक आपत्ती मृत्युदर लक्षणीयरीत्या कमी करणे: २००५-२०१५ या कालावधीच्या तुलनेत २०२०-२०३० या दशकात सरासरी १००,००० जागतिक मृत्यूदर कमी करण्याचे उद्दिष्ट.
२०३० पर्यंत जागतिक स्तरावर बाधित लोकांची संख्या लक्षणीयरित्या कमी करणे: २००५-२०१५ या कालावधीच्या तुलनेत २०२०-२०३० या दशकात सरासरी १००,००० जागतिक आकडा कमी करण्याचे उद्दिष्ट.

२०३० पर्यंत जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) संबंधात थेट आपत्ती आर्थिक नुकसान कमी करणे: महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना होणारे आपत्ती नुकसान आणि मूलभूत सेवांमध्ये व्यत्यय, ज्यामध्ये आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांचा समावेश आहे, त्यांच्यात लवचिकता विकसित करणे.

राष्ट्रीय आणि स्थानिक आपत्ती जोखीम कमी करण्याच्या धोरणांसह देशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढवणे: सध्याच्या चौकटीच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या राष्ट्रीय कृतींना पूरक म्हणून पुरेशा आणि शाश्वत पाठिंब्याद्वारे २०३० पर्यंत विकसनशील देशांसोबत आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळविणे. लोकांना पूर्व चेतावणी प्रणाली आणि आपत्ती जोखीम माहिती आणि मूल्यांकनांची उपलब्धता आणि प्रवेश लक्षणीयरीत्या वाढविणे.

प्र. शहरी भागात येणारा पूर ही एक उदयोन्मुख हवामान-प्रेरित आपत्ती आहे. या आपत्तीची कारणे चर्चा करा. गेल्या दोन दशकांत भारतात आलेल्या अशा दोन मोठ्या पुरांची वैशिष्ट्ये सांगा. अशा पूरांना तोंड देण्यासाठी भारतातील धोरणे आणि चौकटींचे वर्णन करा. (२५० शब्दांत उत्तर लिहा – १५ गुण)

शहरी भागात येणारा पूर यासाठी नैसर्गिक कारणे तर आहेतच पण त्याहून अधिक मानवनिर्मित कारणे जबाबदार आहेत.

शहरी पुरांची नैसर्गिक कारणे – नैसर्गिक हवामान घटना जसे की चक्रीवादळे, ढगफुटी इ. उदा. २००५ मध्ये मुंबईमध्ये केवळ २४ तासांत ३७ इंच पाऊस झाला.

शहरी पुरांची मानवनिर्मित कारणे –

भारतीय शहरांचे काँक्रिटीकरण झाल्यामुळे पाणी शोषण्याची क्षमता कमी झाली आहे. उदा. मुंबईमध्ये गेल्या २७ वर्षांत बांधलेल्या क्षेत्रात ९९.९% वाढ झाली आहे.

जुनी आणि अपुरी ड्रेनेज व्यवस्था.

नैसर्गिक जल संस्थांचा विनाश: उदा. बंगळुरूने ७९% जल संस्था गमावल्या आहेत, ज्यामुळे पूरस्थितीला तोंड देण्याची क्षमता कमी झाली आहे.

जंगलतोड आणि हरित क्षेत्रांचे नुकसान: जंगले आणि पाणथळ जागांचे संवर्धन न केल्याने जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे शहरी भागात वेगाने पाणी येते.

पुरांचा सामना करण्यासाठी शहरी पुरांवरील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मार्गदर्शक तत्त्वे (२०१०): प्रत्येक शहरासाठी शहरी पूर व्यवस्थापन योजना तयार करणे.

पाणी शोषण्याची क्षमता सुधारण्यासाठी आणि पृष्ठभागावरील पाणी कमी करण्यासाठी पर्जन्य जल संचयन धोरण तयार करणे.

चांगल्या पूर व्यवस्थापन पद्धती अंमलात आणण्यासाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी क्षमता-निर्माण कार्यक्रम तयार करणे.

अटल मिशन फॉर रेजुव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) व स्मार्ट सिटीज मिशन (२०१५) यात हरित पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणे, जसे की उद्याने आणि पाणथळ जागा, जे जास्त पावसाचे पाणी शोषून घेण्यासाठी नैसर्गिक बफर म्हणून काम करतात. राष्ट्रीय इमारत संहितेनुसार पूर मैदानात बांधकामावर निर्बंध आहेत.

अभ्यासक्रमातील संकल्पना व चालू घडामोडी यानुसार अपेक्षित प्रश्नांची तयारी करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sushilbari10@gmail.com