यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या पायाभूत सुविधांची चर्चा आपण या लेखात करणार आहोत. भारतात नव्याने उभारले जाणारे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे रस्ते, बंदरे, विमानतळे, पूल, रेल्वे, पाणी व्यवस्था, पॉवर ग्रिड, दूरसंचार नेटवर्क आणि इमारती इ. यांचा अभ्यास इथे अपेक्षित आहे. उदा. भारतीय रेल्वेने जम्मू आणि काश्मीरमध्ये नव्याने बांधलेला चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल.
● २०२४ मधील यूपीएससी पूर्वपरीक्षेतील प्रश्न बघा –
● खालील विमानतळांचा विचार करा:
१. डोनी पोलो विमानतळ
२. कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ
३. विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
अलिकडच्या काळात, वरीलपैकी कोणते विमानतळ ग्रीनफिल्ड प्रकल्प म्हणून बांधले गेले आहेत?
१) फक्त १ आणि २ ब) फक्त २ आणि ३ क) फक्त १ आणि ३ ड) १, २ आणि ३
इथे सर्वप्रथम ग्रीनफील्ड प्रकल्प म्हणजे काय ते समजून घेवूयात, ग्रीनफील्ड प्रकल्प असे प्रकल्प असतात ज्यात पूर्वी अविकसित जमिनीवर नवीन सुविधा किंवा पायाभूत सुविधांची उभारणी केली जाते.
१९ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरू झालेले डोनी पोलो विमानतळ, अरुणाचल प्रदेशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ आहे. हे पूर्वीच्या अविकसित जमिनीवर पूर्णपणे नव्याने बांधले गेले आहे.
२० ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू झालेले कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील ग्रीनफिल्ड प्रकल्प म्हणून वर्गीकृत आहे. हे विमानतळ पर्यटन आणि बौद्ध सर्किटमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी विकसित केले गेले.
विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ग्रीनफिल्ड प्रकल्प नाही कारण ते विद्यामान विमानतळ सुविधेचे श्रेणीवर्धन आणि विस्तार करून विकसित केले गेले आहे.
भारतातील कार्यान्वित काही ग्रीनफिल्ड विमानतळ: शिर्डी विमानतळ (महाराष्ट्र), कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (केरळ), पाक्योंग विमानतळ (सिक्कीम), काझी नझरूल इस्लाम विमानतळ (पश्चिम बंगाल).
● २०२३ मधील यूपीएससी पूर्वपरीक्षेतील प्रश्न बघा –
● प्र. भारताच्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:
१. स्वर्णिम चतुर्भुज प्रकल्पातील पूर्व-पश्चिम कॉरिडॉर दिब्रुगड आणि सुरत यांना जोडतो.
२. त्रिपक्षीय महामार्ग म्यानमारमार्गे मणिपूरमधील मोरेह आणि थायलंडमधील चियांग माई यांना जोडतो.
३. बांगलादेश-चीन-भारत-म्यानमार आर्थिक कॉरिडॉर उत्तर प्रदेशातील वाराणसीला चीनमधील कुनमिंगशी जोडतो.
वरीलपैकी किती विधाने बरोबर आहेत?
अ) फक्त एक ब) फक्त दोन क) सर्व तीन ड) एकही नाही
असे प्रश्न सोडविताना नकाशाच्या मदतीने केलेला अभ्यास आपल्याला ‘फोटोग्राफिक मेमरी’ च्या आधारे अचूक उत्तरकडे घेवून जातो.
सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प नेटवर्क
हे उत्तरेकडील श्रीनगरला दक्षिणेकडील कन्याकुमारीशी आणि पूर्वेकडील सिल्चरला पश्चिमेकडील पोरबंदरशी जोडते. म्हणून, विधान १ चुकीचे आहे.
पूर्व-पश्चिम कॉरिडॉर :
यात एनएच २७ मार्गे ३,३०० किलोमीटर लांबीचा पोरबंदर-राजकोट-सामाखियाळी-राधनपूर-कोटा-झांसी-कानपूर-लखनौ-अयोध्या-गोरखपूर-मुजफ्फरपूर-दरभंगा-सुपौल-पूर्णिया-किशनगंज-गालगलिया-बिजनी-गुवाहाटी-नागाव-डबाका ते सिल्चर असा मार्ग आहे.
उत्तर-दक्षिण कॉरिडॉर – हा ४,००० किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर आहे जो एनएच ४४ वरून श्रीनगर-उधमपूर-जम्मू-जालंधर-दिल्ली-आग्रा-ग्वाल्हेर-झांसी-नरसिंगपूर-लखनाडोन-नागपूर-हैदराबाद-बंगळूरु-सलेम-मदुराई मार्गे कन्याकुमारीपर्यंत जातो.
त्रिपक्षीय महामार्ग :
हा महामार्ग म्यानमारमार्गे मणिपूरमधील मोरेह आणि थायलंडमधील माई सॉट यांना जोडतो. त्यामुळे विधान २ हे चुकीचे आहे.
बांग्लादेश-चीन-भारत-म्यानमार आर्थिक मार्गिका: ही कोलकाता शहराला चीनमधील कुनमिंग शहराशी जोडते. म्हणून, विधान ३ हे चुकीचे आहे.
पायाभूत सुविधांचा अभ्यास करताना भारताचा संबंध असलेल्या आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधांवरही प्रश्न विचारले जातात. हे या प्रश्नावरून लक्षात घ्या.
● प्र. खालील जोड्या विचारात घ्या:
वरीलपैकी किती जोड्या योग्य जुळलेल्या आहेत?
अ) फक्त एक जोडी ब) फक्त दोन जोड्या क) सर्व तीन जोड्या ड) कोणतीही जोडी नाही
भारताला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला असून त्यावर विकसित झालेल्या बंदरांवर प्रश्न नियमितपणे अपेक्षित असतात.
कामराजार पोर्ट :
हे तामिळनाडूतील एन्नोर येथे स्थित आहे. हे भारतीय सरकारच्या मालकीचे एकमेव कॉर्पोरेट पोर्ट आहे.
मुंद्रा पोर्ट :
भारतातील सर्वात मोठे खासगी मालकीचे बंदर मुंद्रा पोर्ट आहे, जे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात स्थित आहे.
जवाहरलाल नेहरू पोर्ट :
याला न्हावा शेवा पोर्ट म्हणूनही ओळखले जाते आणि हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे.
भारतीय अर्थव्यवस्था ज्या वेगाने विकसित होत आहे, त्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधांचे महत्त्व लक्षात घेता यूपीएससी पूर्वपरीक्षेत त्यावर आगामी काळातही प्रश्न अपेक्षित आहेत.
पोर्ट वैशिष्ट्य
१ कामराजार पोर्ट कंपनी म्हणून नोंदणीकृत झालेले भारतातील पहिले मोठे बंदर
२ मुंद्रा पोर्ट भारतातील सर्वात मोठे खाजगी मालकीचे बंदर
३ विशाखापट्टणम भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर पोर्ट
sushilbari10 @gmail. com