इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आधार मिळणार आहे. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध होणार आहे.

योजनेच्या अटी

Wardha, dr babasaheb ambedkar jayanti, 15 days Campaign Launched , Caste Validity Certificate, Backward Class Students, caste validity for admission, caste validity for student,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्व, घ्या विशेष मोहिमेत जात पडताळणी प्रमाणपत्र
dr ambedkar jayant violence marathi news
डॉ. आंबेडकर जयंती साजरी करून अक्कलकोटजवळ वाद; दलित-सवर्ण संघर्ष
bmc, mumbai municipal corporation, Organizes Facilities,Babasaheb Ambedkar s Birth Anniversary, near Chaityabhoomi area, bmc Organizes Facilities Chaityabhoomi, ambdekar followers, rajgruh dadar, Chaityabhoomi dadar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेकडून सेवा-सुविधा
Ramabai Ambedkar Nagar, Mumbai,
मुंबई : रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास, १३,४०० रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण
  • विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी किंवा पदविका परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
  • या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्के गुण असणार आहे.
  • विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २ लाख ५० हजारपेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा, अर्थात स्थानिक नसावा.
  • गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
  • विद्यार्थी व्यावसायिक पाठय़क्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधारकार्डाशी संलग्न करून घेणे बंधनकारक आहे.
  • सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही.

लाभार्थी प्रक्रिया

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना व सविस्तर माहिती https://mahaeschol.maharashtra.gov.in, https://sjsa.maharashtra.gov.in, https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.